Breaking News

सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश ;परदेशातील एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा बहाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार...

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली असून ही अतिशय आनंदाची बाब आहे यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत व्यक्त केला.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी मिळते. यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबविली जाते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. त्यामुळे त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत, शिवाय सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *