Breaking News

सामाजिक

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा …

Read More »

अनुसूचित जाती, जमाती, मराठा, ओबीसींसाठींच्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन खूप सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील …

Read More »

आणि सुषमा अंधारे यांनी शरद पवारांच्या मदतीचा किस्सा सांगत भर कार्यक्रमातच रडल्या शरद पवारांनी एक फोन केला आणि पाच तासात मी दिल्लीत त्यांच्यासमोर हजर होते

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुरोगामी चळवळीतील महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली. परंतु बंडखोरीवरून शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री यांना आपल्या वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी चांगलेच घायकुतीला आणले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून अश्वाघ्य पध्दतीने सुषमा अंधारे यांच्यावर …

Read More »

अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेसाठीच्या अर्जाची मुदत पुन्हा वाढविली इच्छुकांचा चांगला प्रतिसाद असल्याने ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल …

Read More »

दोन वर्षांत सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची ग्वाही

आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणेही राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची दर दोन महिन्यातून तर शिक्षकांची दर तीन महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती आदिवासी …

Read More »

शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल. शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, …

Read More »

२०२१-२२ वर्षाचे या ५१ जणांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात …

Read More »

अजित पवार यांचा लोककलावंतांसाठी पुढाकार, आर्थिक विकास महामंडळ स्थापन्यासाठी सरकारला पत्र लोककलावंतांना वृद्धापकाळात निवास, भोजन, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी महामंडळ आवश्यक...

महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, लोक कलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी …

Read More »

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, कामगारांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी Ease of Doing Business कामगारांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध ; कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

“कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना आर्थिक साह्य, वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक साह्य यासारखे विविध फायदे प्रदान करण्यात येत असून यामुळे राज्यातील कामगारांना त्यांच्या हिताचे लाभ मिळतील”, असा विश्वास कामगार मंत्री डॉ.सुरेश …

Read More »

स्थानिकांचा विरोध डावलून अखेर बारसूत रिफायनरी प्रकल्पासाठी माती परिक्षण पोलिसांच्या सौम्य लाठिमारानंतरही स्थानिक विरोधकांचे ठिय्या आंदोलन

२०१४ साली राज्यात आणि केंद्रात भाजपाच्या नेत़ृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर कोकणातील नाणार येथे रिफानरी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा कऱण्यात आली. मात्र त्यास स्थानिक नागरिकांबरोबरच राजकिय नेत्यांचा विरोध वाढल्याने अखेर नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्दबातल करण्यात आला. त्यानंतर सदरचा प्रकल्प हा राजापूर तालुक्यातील बारसू सोलगावात स्थलांतरीत कऱण्यात आला. मात्र या …

Read More »