Breaking News

आणि सुषमा अंधारे यांनी शरद पवारांच्या मदतीचा किस्सा सांगत भर कार्यक्रमातच रडल्या शरद पवारांनी एक फोन केला आणि पाच तासात मी दिल्लीत त्यांच्यासमोर हजर होते

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुरोगामी चळवळीतील महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटानेही त्यांची उपनेत्या आणि प्रवक्त्या म्हणून नियुक्ती केली. परंतु बंडखोरीवरून शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्री यांना आपल्या वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी चांगलेच घायकुतीला आणले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून अश्वाघ्य पध्दतीने सुषमा अंधारे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. यावरून सुषमा अंधारे यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार दाखल करून घेईना ही घटना सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगताना त्या ढसाढसा रडल्या.

तसेच शरद पवार यांच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचंही सुषमा अंधारे यांनी नमूद केलं. त्या मंगळवारी ९ मे रोजी साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता.
यावेळी पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, माझं चुकत असेल तर तुम्ही कान पकडा, मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी तुमच्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर मी जे पत्र लिहिलं होतं तेच मी वाचणार आहे. संजय राऊतांनी या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचं मला सांगितलं गेलं. मात्र, हे पत्र मी पुन्हा एकदा वाचून दाखवलं पाहिजे. मला शरद पवार यांचा राजीनामा नको होतो, म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं, असंही त्या म्हणाल्या.

तसेच शरद पवारांविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, खरंतर मी शरद पवार यांना लिहावं किंवा सांगावं एवढी प्रज्ञा माझी निश्चितच नाही. मात्र, केवळ पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील बहुजन, उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज जाण असणाऱ्या कुणालाही पवारांचा राजीनामा मानवणार नाही, असेही नमूद केले.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, मी सभागृहात सांगू शकणार नाही की शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केलं आणि काय नाही. शरद पवारांमुळे माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसतं आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले. मात्र, मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि शरद पवारांपर्यंत माहिती पोहचवली. माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात मी दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते, याची आठवणही सांगितली.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *