वैरणीला दिलेले पैसे परत मागितले म्हणून दलित विधवा महिलेला साताऱ्यात क्रुरपणे मारहाण वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओ ट्विट करत व्यक्त केली खंत

देशात आणि महाराष्ट्रात भाजपा विचाराचे सरकार सत्तेत आल्यापासून दलितांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पैसे देऊनही जनावरांसाठी वैरण आणून दिले नाही म्हणून दिलेले पैसे परत मागितले म्हणून गावातील काही लोकांनी सदर विधवा दलित महिलेला भर रस्त्यात क्रुरपणे लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत हे थांबतच नाही का? असा सवाल करत शब्दच शुचत नसल्याचे सांगितले.

माण तालुक्यातील एका दलित विधवा महिलेने गावातीलच व्यक्तीला घराच्या जनावरांसाठी लागणारे वैरण आणण्यासाठी पैसे दिले होते. परंतु पैसे देऊनही वैरण आणून दिले नाही. त्यामुळे सदर महिलेने त्या व्यक्तीकडे वैरणीसाठी दिलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावरून सदर व्यक्ती आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तींनी सदर महिलेला रस्त्यातच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत निदर्यीपणे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी वास्तविकता समाजासमोर आणली आहे.

ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे थांबतच नाही, का? साताऱ्यात एका दलित विधवेला ४ पुरुषांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा गुन्हा काय? तर तीने वैरणीसाठी, म्हणजे गुरांच्या चाऱ्यासाठी दिलेले पैसे पण, चारा न मिळाल्याने तिचे स्वतःचे पैसे ती परत मागत होती म्हणून. तिला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ इतका विचलित करणारा आहे की, या जातीय अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी मला शब्द ही सापडत नाहीयेत. अगदीच क्रूर आणि अमानुष, असे सांगत जातव्यवस्थेसमोरची हतबलता व्यक्त केली.

दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील तीन दलित मुलांना शेळी-मेढ्या चोरल्याच्या संशयावरून सवर्ण समाजातील व्यक्तींनी निदर्यपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेस अद्याप महिनाही पूर्ण होत नाही. तोपर्यंत सातऱ्यातील माण तालुक्यातील ही घटना उघडकीस आल्याने जात व्यवस्था किती खोलवर रूजली आहे याचे चित्रच समोर आले आहे.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *