Breaking News

Tag Archives: prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेना सल्ला, जी चूक सोनिया गांधींनी केली ती करू नका

२००९ साली गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येणार होते. पण त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी एका चुकीचे भाषांतर केलेल्या हिंदी वाक्य वापरायला लावले. त्या शब्दामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांच्या सल्लागाराचा शब्द ऐकू नये नाही तर त्यांचा प्रश्न सुटणारच नाही …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादीला लागू नये…

आजच्या संविधान महासम्मान रॅलीच्या निमित्ताने काही हौशींनी सांगितले की, तुम्ही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोला. तुम्ही मंडलच्या बाजूने की, कमडंलूच्या बाजूचे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी आताच ओबीसी नेते छगन भुजबळ असो नाही तर प्रकाश शेंडगे यांना मी आत्ताच सांगतो की, माझ्या नादीला लागू नका. कारण तुम्ही ओबीसी …

Read More »

‘वंचित’ची २५ नोव्हेंबरच्या महासभेला राहुल गांधी यांना आमंत्रण

भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून येत्या २५ नोव्हेंबर रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी याना देण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बॅलार्ड पिअर्स येथील वंचितच्या राज्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, पंतप्रधान मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत का ? मोदींच्या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका

एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी …

Read More »

कॉफी गोड होती की कडू? प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी साखर टाकून…. राजकिय चर्चा कोणतीही झाली नाही

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांचे राजकिय वैर सर्वांना माहित आहे. मात्र आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील एका कार्यक्रमाचे निमित्त साधून प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची मोठ्या वर्षाच्या अंतराने भेट झाली. मात्र या भेटीत महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम…अन्यथा ४८ जागा लढविणार इंडिया आघाडीने सात दिवसात निर्णय घ्यावा

सन २०१९ च्या लोकसभा ६.९८ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही, आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यासंबधी काँग्रेसला रस आहे का, या संबधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या पत्राच्या उत्तराची अपेक्षा आहे असे सांगत जर सात दिवसात …

Read More »

त्या व्हिडिओवर प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, सत्ता पिलीय? सत्तेबरोबर भ्रष्ट? की दोन्ही गोष्टी केल्यात

काल शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभर होते. त्यामुळे नागपूरची चार तासाच्या ढगफुटी सदृष्य पावसाने तुंबई झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला जाता आले नाही. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरची पाहणी केली. यावेळी पावसामुळे झालेल्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुच्या हृदयात थेट चाकू महिला आरक्षण म्हणजे निव्वळ धूळपेक

गणेश चर्तुर्थीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नव्या इमारतीत एकप्रकारे गृहप्रवेश केला. मात्र हा प्रवेश करताना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या कोणत्याही प्रकार कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत याची काळजी घेतली. त्याचबरोबर विशेष अधिवेशनाचे कामकाजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार आज या नव्या इमारतीत सुरु झाले. तसेच नव्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, एकिकडे द्वेष पसरविणारा भाजपा तर दुसरीकडे लाचार… नूह मधिल हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक

भाजपा-काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना सावध करत म्हणाले की, तुमच्या एका बाजूला जातीयवादी भाजपा-आरएसएस आहे. जे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, …लाखो मते मिळवले पण चर्चेला बोलावतच नाही इंडिया आघाडीच्या बॉयकॉटवर आंबेडकरांची प्रतिक्रिया

इंडिया आघाडी (IndiaAliance) ने काही निवडक चॅनल्स आणि अँकरच्या चर्चासत्रात प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडियावर घातलेल्या या बहिष्कारावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मीडियावर टीकास्त्र सोडले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकीकडे इंडिया अलायन्स (IndiaAliance) मीडियावर घातलेल्या बहिष्काराची चर्चा सुरू …

Read More »