Breaking News

Tag Archives: prakash ambedkar

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतच समझोता नाही

महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार, दोन तारखेपर्यंत भाजपाविरोधात मजबूत आघाडी

या लोकसभा निवडणूकीत आमचा प्रयत्न होता की, भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजपा विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. मुंबई दादर येथील डॉ …

Read More »

‘एकत्रित या’ प्रकाश आंबेडकर यांना जितेंद्र आव्हाड यांची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले ९ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरुय

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील लोकसभा निवडणूकीसंदर्भात जागा वाटपाची चर्चा सुरु होती. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत काही घडामोडी घडल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडी बाबतची भूमिका जाहिर केली. …

Read More »

वंचितच्या भूमिकेवर नाना पटोले म्हणाले, आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा मन:पूर्वक आभारी असल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हॅंडलवर व्हीडिओ पोस्ट करुन व्यक्त केली. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सहभागी व्हावे किंवा नाही याबाबत अंतिम भूमिका …

Read More »

मविआतील वंचितच्या समावेशावरून रंगलेल्या राजकारणाचा पहिला टप्पा पूर्ण?

देशात लोकसभा निवडणूकीची घोषणा तसेच निवडणूकीसाठीची आचारसंहिता जाहिर होऊन जवळपास एक आठवड्याचा कालावधी झाला. त्यातच देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीत पूर्वीप्रमाणे एकाचवेळी दिसून येणारा प्रचाराचा धुराळा सध्या तरी सर्वच राज्यात दिसून येत नाही. मात्र पडद्या आड अनेक आघाड्या-बिघाड्यांचे राजकारण चांगलेच शिजत असल्याचे दिसून …

Read More »

संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय एकांगी त्यांनी…

शनिवारी प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार शाहु महाराज यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील युतीबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करताना म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाबरोबरील युती आता राहिलेली नाही असे जाहिर करत आता जमलं तर महाविकास आघाडीसोबत युती नाही …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमचं टार्गेट ठरलेलं आहे…ती युती आता राहिली नाही

आमचं टार्गेट आम्ही ठरवले आहे, भाजपाला पराभूत करणे हेच आमचे टार्गेट आहे. यामुळे टार्गेट मिळवण्यासाठी छोटे-मोठे हेवेदावे आम्ही बाजूला सारत आहोत. आमचं म्हणणं आहे की, त्यांची भांडणं संपली पाहिजेत. त्यामुळे त्यांची भांडणं संपत नसल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी …

Read More »