Breaking News

Tag Archives: prakash ambedkar

पवारांच्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले, युती शिवसेनेशी, बाकीच्याशीं देणं घेणं नाही पुढील काळात जसं घडेल त्यावर प्रतिक्रिया देईल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची युती झाल्यानंतर या युतीमुळे आता महाराष्ट्रामधील राजकीय हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे युतीच्या घोषणेनंतर दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचा आरोप केला. …

Read More »

आंबेडकरांच्या मोदींच्या समर्थनावर शरद पवार म्हणाले, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही वंचितशी युतीचा प्रस्ताव आमच्यासमोर नाही

मागील दोन दिवसांपासून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपाशी संबध असल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे समर्थन केले. तसेच सरकारी यंत्रणांच्या गैरवापरावरही मोदींच्या कृत्याचे समर्थन केले. यावरून प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात वादही झाला. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा …

Read More »

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे …

Read More »

संजय राऊत यांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंनी सांगितल असत तर…. पवारांवरील आरोप हे पूर्वीच्या घटनांवरून त्याचा आता संबध नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर टीका करणं …

Read More »

शरद पवारांवरील आंबेडकरांच्या आरोपावर राऊतांचा बचाव तर पाटील यांच्याकडून अप्रत्यश दुजोरा शरद पवार भाजपाच्या संपर्कात संशय वाढला

राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्याचे नुकतेच जाहिर केले. वंचितचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत झालेला नसतानाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेते शरद पवार हे भाजपाबरोबर होते, आणि आजही भाजपासोबत असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकरांच्या या आरोपनंतर ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

युतीची घोषणेनंतर उध्दव ठाकरे म्हणाले, …आम्ही ते सगळं थांबविण्यासाठी एकत्र वंचित महाविकास आघाडीसोबत येण्यास कोणाची हरकत नाही

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली, तरी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली …

Read More »

वंचित-शिवसेना युतीची घोषणा केल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींचाही अंत होणार ईडीच्या मार्फत राजकिय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न

दादर येथील डॉ.आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, वंचित बहुजन …

Read More »

आंबेडकर-ठाकरे युतीवर शरद पवारांचे मोठे विधान सोमवारी वंचित आणि शिवसेना युतीची अधिकृत घोषणा

एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास …

Read More »

प्रकाश आंबेडकरांचे भाकित, फडणवीसांना आवडणार नाही मात्र पुढील मुख्यमंत्री विखे-पाटील… विधान परिषद निवडणूकीतील तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य

विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. मात्र या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक ठरत आहे ती नाशिक पदवीधर मतदारसंघाची. या निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसने उमेदवार जाहीर करूनही सदर उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला. तसेच पाठिंब्यासाठी भाजपाकडे मदत मागणार असल्याचे वक्तव्य केले. …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, हेगडेवार-गोळवळकरांनी आजच्या भाषेत… नाव जरी नाही घेतले तरी खोक्यांनी पैसे घेतले

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करत आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदारांनी राळ उठवून दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यातच आता काल भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारणीसाठी भीका मागितल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून सर्वचस्तरातून टीका होत आहे. …

Read More »