Breaking News

शरद पवारांवरील आंबेडकरांच्या आरोपावर राऊतांचा बचाव तर पाटील यांच्याकडून अप्रत्यश दुजोरा शरद पवार भाजपाच्या संपर्कात संशय वाढला

राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्याचे नुकतेच जाहिर केले. वंचितचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत झालेला नसतानाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेते शरद पवार हे भाजपाबरोबर होते, आणि आजही भाजपासोबत असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकरांच्या या आरोपनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आंबेडकरांना सल्ला देत महाविकास आघाडीत यायचे असेल तर मविआच्या नेत्यांवर टीका करू नका असा सल्ला देण्यास २४ तासही उलटत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस-पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार यांनाच पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात आणून ठेवल्याचे दिसत आहे.

जवळपास अडीच वर्षापूर्वी अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे औट घटकेचे सरकार स्थापन केले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोप करत शरद पवार हेच भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप केला.

या आरोपाची गंभीर दखल उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना सल्ला देत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करू नका असा सल्ला दिला.

या घटनेला अडीच वर्षाचा काळ लोटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेमागे शरद पवार यांना खेळी होती असे वक्तव्य करत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या शरद पवारांवरील आरोपाला अप्रत्यक्ष पुष्टीच दिली. त्यामळे प्रकाश आंबेडकर आणि जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार शरद पवार हेच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले.

वंचित बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये. असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. शरद पवार हे भाजपाचे आहेत, अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.
तसेच भाजपाच्या यंत्रणेनं सगळ्यात जास्त हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर केले. संजय राऊत म्हणाले, भविष्यात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. अशावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, प्रमुख स्तंभ यांच्यावर सर्वांना ऐकमेकांशी आदर ठेवून बोललं पाहिजे.

प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांच्याशी काही मतभेद असू शकतात. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चाही केली आहे. भविष्यात आम्ही सर्व एकत्र बसून हे मतभेद दूर करू, असा विश्वास व्यक्त केला.

अपूर्व आणि अद्वैत हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. ते भारतीय जनता पक्षात होते. ते उद्या दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे हे फार मोठी परंपरा राजकारणात आहे.

अपूर्व आणि अद्वैत हे तरुण पिढीचे नेते राजकारणात आहेत. ते भाजपतून शिवसेनेत येत आहेत. नगर जिल्ह्यातून आणखी काही नेते शिवसेनेत येणार आहेत. महाराष्ट्रातून हळूहळू इनकमिंग सुरू होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *