Breaking News

‘एकत्रित या’ प्रकाश आंबेडकर यांना जितेंद्र आव्हाड यांची विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुसस्कर्ते आहात, तुमचे आंबेडकरी विचारांशी रक्ताचे नाते आहे आणि आमचे विचारांचे नाते आहे. त्यामुळे रक्त आणि विचार एकत्र आले की आपण कोणालाही थोपवू शकतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तर मी माझी भूमिका मांडली आहे. त्यांना कळत की कळत नाही. हे मी नाही सांगणार. कारण ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. ते वकील आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकरांचे रक्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण शत्रूच्या विचाराशी लढताना एक पाऊल मागे घ्यावे लागते. त्यामुळे आंबेडकरांनी न रागवता याबाबतचा विचार कराव, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती केली. तसेच, जागावाटपाबाबत जे काही तिढे आहेत, ते सर्व तिढे सुटले जातील, असे यावेळी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे हे अजित पवार यांना अडचणीत आणत आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या अवमानाबद्दल माहीत नाही. कोर्टाच्या ऑर्डर मध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे की घड्याळ हे चिन्ह आत्ता न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करताना त्याच्या खाली ही गोष्ट न्याय प्रविष्ट आहे अस लिहिणं बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील जनता मूर्ख आहे का? असं तटकरे यांना वाटतं आहे का? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी खा.निवास पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी, अभिजीत पाटील, विद्या लोळगे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *