Breaking News

Tag Archives: satara

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा असणार आहे. विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या क्षमता वृध्दीसाठी प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा घेणार आढावा

राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात राबविण्यात येणाऱ्या स्कुबा डायव्हिंगसारख्या जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे येथे ऐन पावसाळ्यात …

Read More »

कोयना जलाशयाशी संबंधित शासकीय गुपिते कायद्यात बदल कोयना धरण जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. …

Read More »

वैरणीला दिलेले पैसे परत मागितले म्हणून दलित विधवा महिलेला साताऱ्यात क्रुरपणे मारहाण वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओ ट्विट करत व्यक्त केली खंत

देशात आणि महाराष्ट्रात भाजपा विचाराचे सरकार सत्तेत आल्यापासून दलितांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पैसे देऊनही जनावरांसाठी वैरण आणून दिले नाही म्हणून दिलेले पैसे परत मागितले म्हणून गावातील काही लोकांनी सदर विधवा दलित महिलेला भर रस्त्यात क्रुरपणे लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ वंचित …

Read More »

देशातील पहिला कॅनल जोड प्रकल्प सोलापूरात, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे घोषणा, सातारा जिल्ह्यात ५०० एकरावर कृषी उद्योग

महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची शेतकरी व कष्टकऱ्यांबरोबर नाळ जोडलेली होती. त्यांच्याच विचारावर राज्य शासन काम करित असून, शेतकरी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात (ॲग्रो इंडस्ट्री) कृषी उद्योग उभारण्यात येईल. तसेच कराड विमानतळाच्या विकासासाठी हे विमानतळ  महाराष्ट्र औद्योगिक …

Read More »

सातरच्या कास पठारासाठी ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण पर्यटनातून स्थानिक रोजगार वाढीसाठी व्यापक प्रयत्न करणार

सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी आज राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ – ई बसेस, बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे,स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, …

Read More »

माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याचे निर्देश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार समितीची ८३ वी बैठक मंत्रालयात कामगार …

Read More »

लोकसंख्या, प्रभाग रचना नकाशे पालिकेने मागविले जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

सातारा : प्रतिनिधी सातारा पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे व लोकसंख्या वाढीचा अचूक तपशील जनगणना आयोगाकडून मागविला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या वर्तुळात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. पालिकेने निवडणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची ऑनलाईन बैठक मंगळवारी झाली. मात्र बैठकीत …

Read More »

अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …

Read More »