Breaking News

राहुल गांधी यांचा आरोप, १ मिलियन पैसा कोणाचा, चिनी व्यक्तीची गुंतवणूक भारतात कशी ? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हे मुंबईत आले होते. त्यावेळी बांद्रा येथील ग्रॅड ह्यात हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन वर्तमानपत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती मित्र असलेल्या गौतम अदानी आणि चीनी गुंतवणूकदाराकडून १ मिलियन डॉर इतकी रक्कम भारताबाहेर पाठविली आणि तोच पैसा परत आणत त्या पैशातून भारतात पुन्हा संपत्तीची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर अदानी कंपनीच्या शेअरच्या किंमती वाढविण्यात आल्याचा आरोप खळबळजनक आरोप केला.

राहुल गांधी यावेळी म्हणाले की, गौतम अदानी आणि त्यांचे भाऊ विनोद अदानी यांनी जवळपास १ मिलियन इतकी रक्कम जगभरात पाठविली. कालांतराने विविध गुंतवणूक दारांच्या माध्यमातून तोच पैसा पुन्हा भारतात परत आणण्यात आला. विशेष म्हणजे त्याच पैशातून शाबान अहली त्याचा साथीदार तसेच चीनी चांग चुंग-लिंग या चीनी व्यक्तीकडून अदानीच्या शेअरचा भाव वाढवित त्याच्या माध्यमातून मिळालेला पैसा भारतात संपत्ती खरेदी करण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकऱणाची चौकशी देशातील ईडी-सीबीआय का करत नाही असा सवालही केला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, हा सगळा पैसा कोणाचा आहे, चीनी व्यक्ती कडून संपत्तीची खरेदी कशी करण्यात आली या सगळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती नेमून चौकशी करावी आणि त्याची उत्तरे देशाला द्यावीत अशी मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती मित्र असलेल्या गौतम अदानींच्या कंपनीत चिनी उद्योगपतींची गुंतवणूक.

राहुल गांधी यावेळी म्हणाले की, अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, देशाच्या सुरक्षेच्या संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर हे काम सुरू आहे. अश्या कंपन्यांमध्ये चीनी उद्योगपतींची गुंतवणूक असल्यावर देशाच्या सुरक्षा यंत्रणेच्या गोपनीय माहितीवर धोका निर्माण झाला आहे. तसेच अदानी समुहाने आपल्याच शेअर्समध्ये मॉरिशस कनेक्शन वापरुन अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करुन कृत्रिमरित्या आपल्या शेअर्सचे भाव वाढवल्याचा धक्कादायक खुलासा ओसीसीआरपीने केल्याचा आरोप केला.

याशिवाय राहुल गांधी म्हणाले की, १ अब्ज डॉलर्स पेक्षा अधिकचा पैसा हा अदानी यांच्या माध्यमातून बाहेर वेगवेगळ्या देशात गेले आणि नंतर ते परत आले. त्या पैशांचा वापर हे विमानतळ आणि इतर प्रकल्पांमध्ये होत आहे. हा पैसा कुणाचा आहे याची चौकशी ईडी, सीबीआय का करत नाही ? अदानी विरोधात कोणतीही कारवाई करू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबाव यंत्रणांवर असल्याचा आरोप केला.

Check Also

देशाच्या जीएसटी वसुलीत १२.४ टक्क्याने वाढ; दोन लाख कोटींचा टप्पा पार

सबंध देशभरात लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांकडून आणि सर्वच लहान-मोठ्या राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *