Breaking News

Tag Archives: gautam Adani

अंबुजा सिमेंटमधील गौतम अदानी यांची हिस्सेदारी ७० टक्क्यावर २० हजार कोटींची गुंतवणूक झाली

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपनीने अंबुजा सिमेंटमध्ये अतिरिक्त ८,३३९ कोटी रुपये गुंतवले आणि सिमेंट निर्मात्याच्या उत्पादन क्षमतेला मदत करण्यासाठी कंपनीतील हिस्सा ७०.३ टक्क्यांवर वाढवला. अदानी कंपनीने यापूर्वी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीमध्ये ५,००० कोटी रुपये आणि २८ मार्च २०२४ रोजी ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. नवीनतम गुंतवणुकीसह, त्यांनी २०,००० …

Read More »

गौतम अदानी यांच्या प्रकल्पात मुकेश अंबानींची भागिदारी मध्य प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पातील २६% भागभांडवल विकत घेतले

देशातील दोन प्रतिस्पर्धी अब्जाधीशांमधील पहिल्या सहकार्यात, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गौतम अदानी यांच्या मध्य प्रदेश ऊर्जा प्रकल्पातील २६ टक्के भागभांडवल उचलले आहे आणि प्लांट्सची ५०० मेगावॅट वीज कॅप्टिव्ह वापरासाठी वापरण्यासाठी करार केल्याची माहिती बिझनेस लाईन या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावर देण्यात आली. रिलायन्स अदानी पॉवर लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या महान …

Read More »

विधानसभेत चर्चा मुंबईवरची मात्र वाद नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरून

मुंबईतील पायाभूत सुविधांबरोबर मोकळ्या भूखंडाप्रकरणी आणि परवडणाऱ्या दरातील घरांचा प्रश्नी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि त्याच्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र अदानी यांना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याच्या उद्घाटनाला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

दावोसमधील परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या माध्यमातून देशात गुंतवणूक…

महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत …

Read More »

मुकेश अंबानींनी गौतम अदानींना पुन्हा मागे टाकले बायजूचे रवींद्रन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

हुरुन इंडियाने आज देशातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र यंदा अंबानी त्यांच्या पुढे गेले. अंबानींची संपत्ती अदानीपेक्षा ३.३ लाख कोटी रुपये जास्त आहे. …

Read More »

अदानी भेटले अजित पवार गेले भाजपासोबत आता शरद पवारच गेले अदानीच्या घरी भेटीवरून रोहित पवार यांचे वक्तव्य

राज्यात एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांशी तितक्याच घनिष्ट मैत्रीचे पालन करणारे आणि राजकारण आणि व्यक्तीगत मैत्री कोणतीही गल्लत न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रत्येक कृत्याचा अर्थ काढणे त्यामुळेच कठीण होऊन बसते. वास्तविक पाहता अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी आले ते पहिल्यांदा बारामतीत शरद पवार यांच्या एका संस्थेच्या …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, १ मिलियन पैसा कोणाचा, चिनी व्यक्तीची गुंतवणूक भारतात कशी ? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हे मुंबईत आले होते. त्यावेळी बांद्रा येथील ग्रॅड ह्यात हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन वर्तमानपत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती …

Read More »

सत्तेच्या साठमारीत मुंबईतली ‘धारावी’ अदानी प्रॉपर्टीजची शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून काल रात्री उशीरा शासन निर्णय जारी

राज्यात एकाबाजूला आगामी निवडणूकीच्यादृष्टीने महाराष्ट्रातील विरोधकांमध्ये फूट पाडून स्वतःची सत्ता मजबूत करू पाहणाऱ्या भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने मजबूत कऱण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकिय ड्रामेबाजीच्या गदारोळात मुंबईतील महत्वकांक्षी असलेल्या धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अखेर दुबईच्या सेखलिंक कंपनीऐवजी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आम्ही प्रश्न विचारला की तुमची…

२३ जूनला आम्ही पाटण्याला जाणार आहोत. नितीशकुमार मातोश्रीवर आले होते. भाजपासोडून सगळे मातोश्रीवर येतात. विरोधी पक्षांची एकजूट नाही तर स्वातंत्र्यप्रेमींची, देशप्रेमींची एकजूट आहे. जे देशावर प्रेम करतात त्यांनी आमच्या सोबत यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी करत काल परवा अमित शाह आले होते आम्हाला प्रश्न विचारत होते. पण आम्ही विचारले …

Read More »

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, …कोण कोणाला भेटतो यांच्याशी आमचे देणेघेणे नाही अदानी-मोदींचे संबंध काय? आणि २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या …

Read More »