Breaking News

सामाजिक

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »

रात्रीच्या उशीराच्या बैठकीनंतरही मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम दुरूस्तीचा शासन निर्णय आल्याशिवाय उपोषण मागे नाहीच

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जालना येथील आंतरवली सराटे गावी मनोज जरांगे पाटील सुरु केलेल्या उपोषणाच्या आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. या १२ दिवसात कुणबी समाजातील नागरिकांनाही मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच कुणबी असलेल्यांना मराठा असल्याचे जात प्रमाण पत्र देण्याची मागणीही केली. मात्र …

Read More »

धनगर आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडाऱ्याची उधळण भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच- विखे पाटील यांची संयमाची भूमिका

मराठा समाजाला कुणबी समाजाचे आरक्षण देण्याचा मुद्दा गाजत असतानाच राज्याचे महसूलमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज सोलपुरात धनगर समाजाच्या आरक्षणावरून या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने विखे पाटील यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावर भंडारा टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सुरक्षा यंत्रणेत …

Read More »

उत्कृष्ट परसबागा निर्मितीसाठी शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन विजेता शाळेस ५१ हजार रूपयांचे बक्षिस

शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्यात उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेंतर्गत देण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी आणि या उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि …

Read More »

या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मंत्रालयात नुकतीच मंत्री मुनगंटीवार …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, राज्य सरकारच्या निर्णयाचा उपयोग नाही वंशावळीच्या उल्लेखाने व्यक्त केली नाराजी

मागील नऊ-१० दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी जालन्यातील अंबड ताालुक्यातील आंतरवली गावात उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच या आश्वासनानंतर शासन निर्णयही आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. मात्र शासन निर्णय पाहताच आंदोलक मनोज जरांगे पाटील …

Read More »

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, या गोष्टी सुरु होणार २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार

सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, आरक्षण मिळेल नाही तर अंत्ययात्रा निघेल… सरकारला दिली चार दिवसाची मुदत

जालना येथील आंतरवली सराटा गावात मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलनास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं दिसून आलं तर चार दिवसात मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन या असे शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. सरकारच्या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री …

Read More »

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ….आरक्षणाचा जीआर घेऊन या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शिष्टमंडळ जाणार जरांगे पाटील यांच्या भेटीला

मराठा आरक्षणाचा जीआर घेवून या चर्चेची दारं खुली केलीत म्हणून तुम्ही मागचे पाढे वाचू नका असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर त्यांनी आपली प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी जालना येथील आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा …

Read More »

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व घटकांनी एकत्र राहण्याची आवश्यकता कुंभार समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द - मंत्री छगन भुजबळ

कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढं आल पाहिजे. ओबीसींना आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन …

Read More »