Breaking News

सामाजिक

विद्यार्थ्यांनो, परदेश शिष्यवृत्तीकरिता अर्ज करा इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके …

Read More »

महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी …

Read More »

सामाजिक न्याय मंत्री मुंडे, शिक्षणमंत्री गायकवाड, राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली इंदू मिल स्मारकाची पाहणी इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल - धनंजय मुंडे

दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करीत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून, मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे सामाजिक …

Read More »

आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहिर २० आणि २१ जून रोजी तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार

मागील दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही आषाढवारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना पायी जाता येत नव्हती. मात्र यंदा जवळपासच सर्वच निर्बंध शिथील अर्थात काढून टाकण्यात आलेले असून कोरोनाचा प्रादुर्भावही नगण्य स्वरूपात राहीला असल्याने यंदाची आषाढ वारी उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने आषाढवारीसाठी पालखी सोहळ्यांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या …

Read More »

वीज तुटवड्यानंतर आता सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा शॉक घरगुती गॅस एक हजार रूपयांवर दरात ५० रूपयांची वाढ

मागील काही दिवसांपासून कोळसा तुटवड्यामुळे वीज टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला असून देशातील अनेक राज्यांमध्ये वीजेचे लोडशेडींग सुरु झाले आहे. त्यातच आधीच पेट्रोल-डिझेलमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या प्रचंड दरवाढीमुळे महागाईचा सामना करावा लागत असलेल्या सर्वसामान्य नागरीकांचा स्वयंपाकही महाग करून टाकला आहे. केंद्राने घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ केली. त्यामुळे आता घरगुती गॅसची …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी सांगितली, शाहु महाराज आणि प्रबोधनकारांच्या ऋणानुबंधाची आठवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रम

प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. हा महामानव होता. शाहू महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी …

Read More »

मराठी साहित्य संमेलन घ्यायची इच्छा आहे का? मग या संकेतस्थळावर अर्ज करा अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या …

Read More »

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो अडचणी आहेत का? मग ही बातमी वाचाच अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर संवाद दिनाचे आयोजन

मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर आणि तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील …

Read More »

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी इन्फोसिसची मदत होणार आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि इन्फोसिस यांच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि सचिव रणजित देओल यांच्या उपस्थितीत …

Read More »

साहित्य संमेलनात शरद पवार म्हणाले, प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण शरद पवारांच्या हस्ते मराठी साहित्य समेलनाची सुरूवात

प्रोपागंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपागंडा पद्धतशीर पसरवला जात असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. लातूरच्या उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना.य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख …

Read More »