Breaking News

वीज तुटवड्यानंतर आता सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा शॉक घरगुती गॅस एक हजार रूपयांवर दरात ५० रूपयांची वाढ

मागील काही दिवसांपासून कोळसा तुटवड्यामुळे वीज टंचाईचा प्रश्न निर्माण झालेला असून देशातील अनेक राज्यांमध्ये वीजेचे लोडशेडींग सुरु झाले आहे. त्यातच आधीच पेट्रोल-डिझेलमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या प्रचंड दरवाढीमुळे महागाईचा सामना करावा लागत असलेल्या सर्वसामान्य नागरीकांचा स्वयंपाकही महाग करून टाकला आहे. केंद्राने घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची वाढ केली. त्यामुळे आता घरगुती गॅसची किंमत एक हजारावर पोहचली.
घरगुती सिलेंडरचे भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.
मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेसा आहे.
१ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही ६५५ रुपयांवर पोहोचली.
यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २,२५३ रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, १ मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली. देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झाली आहे.
एकाबाजूला महागाईने जनता त्रस्त असतानाच आता त्यात गॅसच्या दरवाढीमुळे आणखी भर पडली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन गॅसच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *