Breaking News

सामाजिक

आठवले, आंबेडकरांना वगळून दलित संघटनांचा सरकारच्या विरोधात महामोर्चा भीमा कोरेगांव प्रकरणी संविधान परिवाराच्या नावाखाली निघणार मोर्चा

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव प्रकरणा नंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी विधानभवनावर दलित समाजातील सर्व संघटनांच्यावतीने संविधान परिवाराच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामोर्चापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांना लांब …

Read More »

मदारी समाजासाठीची पहिली गृहनिर्माण योजना जामखेडमध्ये य.च. मुक्त वसाहत योजनेंतर्गत राबविणार असल्याची मंत्रींची प्रा. राम शिंदे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मदारी समाजातील नागरीकांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य सरकारकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पहिली गृहनिर्माण योजना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सुरु करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत आज २० घरासाठी प्रत्येकी पाच गुंठे जागा आणि प्रत्येकाला ७० हजार रुपये अशा स्वरूपात …

Read More »

तेजोमय संत विचारांची संगीतमय नाट्यानुभूती ‘सत् भाषै रैदास’एक सामाजिक कलाकृती

मुंबई: संजय घावरे भारत ही संतांची भूमी आहे. या मातीत जन्मलेल्या प्रत्येक संताने समाजातील दुर्बल घटकांसाठी वैचारीक, सामाजिक तसंच पारमार्थिक लढा उभारला. बहुजन समाजात जन्मलेल्या बहुतेक संतांनी मनामनात नवविचारांची ज्योत प्रज्वलित करीत नवी क्रांती घडवण्याचा प्रयन्त केला. परंतु तत्कालीन उच्चवर्णीय धर्ममांर्तंडानी त्यांना विरोध करीत नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे …

Read More »

आरोपी मिलिंद एकबोटेच्या तुरूंगवासाचा मार्ग मोकळा मुंबई उच्च न्यायालयाने एकबोटेचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन आज शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळला. त्यामुळे एकबोटेंना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. १ जानेवारी रोजी पुणे जिल्हा शिरुर तालुक्यातील भीमा कोरेगावप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती …

Read More »

मराठा समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी पाच लाख उद्योजक तयार करणार छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजनेचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी मराठा समाजातील होतकरू तरुणांना केवळ नोकरी, रोजगार देण्याच्या उद्देशाने नाही. तर पुढच्या काळात नोकऱ्या देणारे पाच लाख उद्योजक बनवण्याचा उद्देश असल्याचे सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत छ.राजाराम महाराज कौशल्य विकास अभियानाचा शुमारंभ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.  मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात …

Read More »

अल्पसंख्याक उमेदवारांना जात प्रमाणपत्र देताना पक्षपात उपजिल्हाधिका-यांची चौकशी करण्याची आमदार अॅड. पठाण यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे हे जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे पडताळणी करताना अल्पसंख्याक उमेदवारांना क्लिष्ट प्रश्न विचारून उमेदवाराला नाऊमेद करत आहेत. तसेच जात प्रमाणपत्र मिळता कामा नये, याची पुरेपूर दक्षता घेत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार अॅड वारीस पठाण यांनी करत अशा हेतू पुरस्सर वागणाऱे उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांची …

Read More »

अखेर मागासवर्गीयांचे आरक्षण वाचविण्यासाठी आली राज्य सरकारला जाग पदोन्नतीतील कर्मचाऱ्यांची माहीती जमा करण्याचे अवर सचिव, कक्ष अधिकाऱ्यांना आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत असलेल्या सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीत देण्यात आलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरविले. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा किती मागासवर्गीयांना झाला याची माहिती न्यायालयात सादर करून पदोन्नतीतील आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने मुदतीनंतर धावाधाव सुरु केली असून सर्व विभागांच्या अवर सचिव आणि कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळविणाऱ्यांची …

Read More »

चळवळीच्या मजबूतीसाठी विचारवंतासह अर्थिक सुबत्ता गरजेची सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांचे मत

नवी मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव घटनेनंतर ज्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधातला राग व्यक्त केला. त्यांना सोडविण्यासाठी जे जामिन राहीले. वकीलांनी मोफत सेवा दिली. आपल्या समाजावरील अन्याया विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा असे कोणत्याही समाजधुरीणांना वाटले नाही. त्यांना जे जमलं नाही ते जयभिम ग्रुपच्या रिक्षा चालक संघटनेनं केल असून त्यांचा सन्मान करावा …

Read More »

पुरस्कार विजेत्यांनाही मिळणार मानधन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी दलित, आदीवासी, मागासवर्गीयांच्या हिताच्यादृष्टीने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. आता सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या आजवरच्या सर्वच पुरस्कार्थींना यंदाच्या वर्षीपासून मासिक सातशे पन्नास रूपये मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज …

Read More »

तंबाखूमुक्त शाळा, महाविद्यालयांसाठी ६ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम टोल फ्रि नंबर सुरु करण्याचे गृह राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर गुटखा, सिगारेट्स आदी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून एक विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देत या परिसरात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी पोलिस, अन्न व औषध प्रशासनाला दिले. …

Read More »