Breaking News

महाराष्ट्र बंद मध्ये राज्यातील ५० टक्के जनता सहभागी बंद मागे घेत असल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दलित संघटना व डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्रातील ५० टक्केहून अधिक जनतेने सहभागी होत हा बंद यशस्वी केला. त्यामुळे त्यांचे आभार असे सांगत या कोरेगाव भिमा घटनेचे प्रमुख सुत्रधार असलेले भिडे आणि एकबोटे यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेनन याच्याप्रमाणे ३०२ अन्वये खटला दाखल करावा अशी मागणी करत हा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर दिवसभरात बंदची झालेली माहिती देण्यासाठी बलार्ड पिअर येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात १० तास बंद यशस्वीरित्या पूर्ण झाला.

राज्यात काही हिंदू संघटना असून त्यांच्याकडून समाजात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही हिंदूत्ववादी संघटना या केऑस निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत राज्य सरकारने भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत त्यांच्यावर ३०२ अन्वये खटला दाखल करावा असे सांगितले.

कोरेगाव भिमा येथे १ जानेवारीला जवळपास साडेतीन लाख लोक गेले होते. त्यावेळी समाजकंटकांननी त्यांच्यावर दगडफेक करत या गेलेल्या लोकांच्या ४० बसेस जाळल्या आणि फोडल्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

औरंगाबादसह मुंबईतील २ ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याचे मान्य करत संपूर्ण राज्यात बंद शांततेत पार पडला. तसेच या बंदच्या आंदोलनानंतरही या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *