Breaking News

सामाजिक

चळवळीच्या मजबूतीसाठी विचारवंतासह अर्थिक सुबत्ता गरजेची सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांचे मत

नवी मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव घटनेनंतर ज्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधातला राग व्यक्त केला. त्यांना सोडविण्यासाठी जे जामिन राहीले. वकीलांनी मोफत सेवा दिली. आपल्या समाजावरील अन्याया विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा असे कोणत्याही समाजधुरीणांना वाटले नाही. त्यांना जे जमलं नाही ते जयभिम ग्रुपच्या रिक्षा चालक संघटनेनं केल असून त्यांचा सन्मान करावा …

Read More »

पुरस्कार विजेत्यांनाही मिळणार मानधन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी दलित, आदीवासी, मागासवर्गीयांच्या हिताच्यादृष्टीने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. आता सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या आजवरच्या सर्वच पुरस्कार्थींना यंदाच्या वर्षीपासून मासिक सातशे पन्नास रूपये मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज …

Read More »

तंबाखूमुक्त शाळा, महाविद्यालयांसाठी ६ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम टोल फ्रि नंबर सुरु करण्याचे गृह राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर गुटखा, सिगारेट्स आदी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून एक विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देत या परिसरात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी पोलिस, अन्न व औषध प्रशासनाला दिले. …

Read More »

तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी १५ दिवसात मंडळ स्थापनार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी समाजाच्या मुख्य प्रवाहात ज्या पध्दतीने स्त्री-पुरूषांना सन्मानाने जगता येते. त्याच पध्दतीने तृतीयपंथीयांनाही सन्माने जगता यावे याकरिता तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज केली. राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींचा विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी स्वतंत्र कल्याण मंडळ …

Read More »

महाराष्ट्र बंद नंतर दलित समाजाकडून राजकिय अस्तित्वासाठी प्रयत्न नवे नेतृत्व पुढे करण्याच्या हालचालींना वेग

मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षापासून दलित नेत्यांच्या गटाला मुठमाती देवून एका समर्थ राजकिय पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रातील दलित सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र तुकड्यामध्ये विभागलेल्या राजकिय पक्षाच्या गटांच्या नेत्यांना त्यामध्ये फारसे स्वारस्य वाटले नाही. त्यामुळे ऐक्याची दिलेली हाक हवेतच विरली. मात्र कोरेंगाव भिमा येथील घडलेल्या घटनेनंतर …

Read More »

अनाथांना मिळणार १ टक्का आरक्षण राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याची मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी समाजातील कधी भीतीपोटी किंवा मुल नको अथवा अपघाती मृत्यू झालेल्या पाल्यांना अनाथश्रमात दिवस काढावे लागतात. मात्र ही मुल शिक्षण घेवून शासकिय नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना जात राक्षसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ जात लिहीता येत नसल्याने अनेकवेळा नोकरीस पात्र ठरूनही त्यांना मिळत नसल्याने अनाथांना इतर जातींप्रमाणे …

Read More »

पश्चिम महाराष्ट्रातील रॉबीनहूड वाटेगांवकर काळाच्या पडद्या आड ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

मुंबईः प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व्यक्तींकडून धनगर समाजासह मागासवर्गीय समाजावार अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू वाटेगांवकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी सांगलीत निधन झाले. त्‍यांच्या जीवनावर आधारित त्यांच्याच नावाने अर्थात बापू बिरू वाटेगांवकर या नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला होता. बापू बिरु वाटेगावकर यांनी कृष्णा …

Read More »

नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरूंना हज यात्रेची संधी अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातून हज यात्रेसाठी तीनवेळा अर्ज करूनही जर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली नाही अशांना चवथ्यावेळी संधी देवून हज यात्रेला थेट पाठविणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी ११ हजार मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या …

Read More »

दलित तरूणांच्या विरोधातील कोंबीग ऑपरेशन बंद करावे प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र बंद नंतर आज दिवसभरात ठिकठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या दलित तरुणांची कोबींग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबवावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भेट घेतली. त्यानंतर …

Read More »

दलितांच्या विरोधात मेसेजस करणाऱ्यांवर कारवाई कधी? मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेतूपुरस्सर निर्णय घेतल्याची भावना

मुंबईः प्रतिनिधी १ जानेवारी दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर कोरेगाव भिमा आणि सणसवाडी, शिक्रापूर येथील समाजकंटकांनी दगडफेक, वाहनांची जाळपोळीच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदच्या कालावधीत काही ठिकाणी हिसंक कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र कोरेगाव भिमा येथील घटनेनंतर …

Read More »