Breaking News

सामाजिक

मराठा आरक्षणातल्या नोकऱ्या टिकविण्यासाठी सरकार पर्याय शोधणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू केल्यानंतर नोकर भरती करण्यात आली. मात्र या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत मिळालेल्या युवकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायद्यांचा अभ्यास करून पर्याय शोधला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर …

Read More »

ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा महिनाभरात निश्चित करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रवासात राखीव जागा ठेवणे, त्यांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणे आदी गोष्टी राबविण्याबाबत राज्य सरकारने धोरण या आधीच ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. …

Read More »

कामगाराला अपघात घडल्यास ठेकेदारासोबत व्यावसायिकालाही सहआरोपी करणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्याचे काम सुरु असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यापार्श्वभूमीवर एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात होवून बांधकाम करणारा कामगारास दुखापत अथवा दुर्दैवी घटना घडल्यास बांधकाम व्यावसायिकालाही ठेकेदारासोबतच सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री …

Read More »

कमी पटसंख्येच्या शाळांचे स्थलांतर केवळ विद्यार्थ्यांच्या हिताठीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विधान परिषदेत दावा

नागपूर: प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांची सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा हक्क कायम राखण्यासाठी राज्यातील ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद नव्हे तर स्थलांतरित करण्याचा करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घेण्यात आल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी …

Read More »

एससी-एसटीचा अखर्चीक विकास निधी राखीव ठेवण्याचा कायदा करा शिवसेना, काँग्रेसच्या मागासवर्गीय आमदारांची मागणी तर भाजपाच्या आमदारांची पाठ

नागपुर : संजय बोपेगांवकर राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आणि आदीवासी यांच्या विकासाकरीता विविध योजना सरकारकडून राबविण्यात येतात. या योजनांच्या अंलबाजवणीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात असलेला विकासनिधी राज्यकर्त्ये इतर कामाकरीता पळवापळवी करत असल्याने मागास व आदीवासी समाजाची विकास कामे ऱखडली जात असल्याने भारतीय नियोजन आयोगाच्या अपेक्षा प्रमाणे अखर्चीक निधी आंध्र व कर्नाटक सरकारप्रमाणे राखून ठेवण्यासाठी …

Read More »

केंद्र सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांचे ९०० कोटी थकवले आमदार प्रकाश गजभिये यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी केंद्र सरकार कडून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारणासाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र भाजप सरकार राज्यात व केंद्रात सत्तेत आल्यापासून ते बंद असून दोन वर्षातील शिष्यवृत्तीचे ९०० कोटी रूपये या सरकारने थकविले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला. विधान परिषदेत त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ओबीसी …

Read More »

महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करणार गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहीती

नागपूर:प्रतिनिधी “राज्यात घडणाऱ्या महिलावरील अत्याचाराच्या आणि छेडछाडीच्या घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी चार पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करणार असल्याची माहीती राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. यासंदर्भात विधान परिषदेत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अल्पकालीन सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर काँग्रेसच्या अॅड हुस्नबानू खलीफे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण …

Read More »

भटक्या-विमुक्त, इतर आणि विशेष मागासवर्गाच्या उत्पन्न मर्यादेत वाढ आता ८ लाख उत्पन्न असलेल्यांनाही मिळणार आरक्षणाचा लाभ

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील भटक्या व विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासप्रवर्गातील जास्तीत जास्त मुलांना आरक्षणाचा लाभ मिळावा याकरीता त्यांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या वर्गातील मागासवर्गीयांसाठी असलेल्या ६ लाख रूपयांच्या उत्पन्नात आणखी दोन लाख रूपयांच्या उत्पन्नात वाढ करत ८ लाख रूपयांपर्यत मर्यादा …

Read More »

आपली भूमी..स्वच्छ चैत्यभूमी..स्वच्छ भूमी आंबेडकरी चळवळीतील तरूणांचा आगळावेगळा उपक्रम

मुंबई:  संजय बोपेगांवकर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी ३ तारखेपासून आंबेडकर अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. तीन दिवसांच्या अलोट गर्दीमुळे हा परिसर अस्वच्छ होतो. त्याचा आपल्याच बांधवांच्या आरोग्याला त्रास होतो, हे ओळखून तरूण आंबेडकरी अनुयायांनी पुढाकार घेत “आम्ही आंबेडकरवादी, आपली चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हा आगळा वेगळा …

Read More »

आंबेडकरी चळवळीचे तीन तेरा ? दलित- आदीवासी नव्या राजकिय पर्यायाच्या शोधात

मुंबई : संजय बोपेगांवकर दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर देशातील दलित, आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सुरु केलेला लढा पुढे नेणे गरजेचे होते. मात्र गेल्या ५० ते ६० वर्षात विशेषत: महाराष्ट्रात या चळवळीचे नेमके काय झाले? याची चर्चा करणे सद्यपरिस्थितीत करणे बनणे क्रमप्राप्त बनले आहे. यातील विशेषत: …

Read More »