Breaking News

नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरूंना हज यात्रेची संधी अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातून हज यात्रेसाठी तीनवेळा अर्ज करूनही जर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली नाही अशांना चवथ्यावेळी संधी देवून हज यात्रेला थेट पाठविणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी ११ हजार मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

त्याचबरोबर राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये (बजेट) वाढ करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मस्जिद बंदर येथील हज हाऊस येथे राज्यमंत्री कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा-२०१८ संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, उपसचिव तडवी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खाँ, कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख आदी उपस्थित होते.

हज समितीमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. ही समिती प्रत्येक घटकातल्या व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर आहे. यामुळेच या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्येही वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. राज्यासह देशभरातून हज यात्रेला दरवर्षी हजारो यात्रेकरु जात असतात. मागील वर्षी राज्यातील ९ हजार २४४ यात्रेकरुंना वाटा देऊन हज यात्रेची संधी देण्यात आली होती. केंद्र व राज्य शासनाने यात आणखी २० टक्क्यांची वाढ केली असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ११ हजार ५२७ यात्रेकरुना हज यात्रेची संधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सातत्याने तीन वर्ष अर्ज करुन चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची योजना बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यंदाच्या वर्षी हज २०१८ साठी राज्यभरातून ४३ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले आहे. उर्वरित ४१ हजार ८२४ यात्रेकरूंमधून संगणकीय सोडतीद्वारे सुमारे ९ हजार यात्रेकरूंची निवड आज करण्यात आली. यापैकी १ हजार ९३९ जागा ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता आणि १६ महिला करिता जागा राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इम्तियाज काझी यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, उपसचिव श्री. तडवी, महाराष्ट्र राज्य हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खाँ,कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, शाखा अधिकारी फारूक पठाण आदी यावेळी उपस्थित होते.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *