Breaking News

मराठी साहित्य संमेलन घ्यायची इच्छा आहे का? मग या संकेतस्थळावर अर्ज करा अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या व राज्यात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करू शकतील. साहित्यबाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विज्ञान, क्रीडा, कृषि, आरोग्य, पर्यावरण व अध्यात्मिक. यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुउद्देशीय संस्थांना अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही.
विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “नवीन संदेश या सदरात ‘अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान या शीर्षाखाली ‘what’s new’ या सदरात ‘Grant in Aid for Annya Marathi Sahitya Sammelane’ या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीनतम संदेश’ या सदरात ‘अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान’ शीर्षाखाली उपलब्ध होतील, तसेच सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दूसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५२२२४३२ ५९३१) येथे विहित कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.
अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर (०६ मे २०२२ ते ०६ जून २०२२) येणाऱ्या अर्जांचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी कळविले आहे.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *