Breaking News

आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहिर २० आणि २१ जून रोजी तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार

मागील दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही आषाढवारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना पायी जाता येत नव्हती. मात्र यंदा जवळपासच सर्वच निर्बंध शिथील अर्थात काढून टाकण्यात आलेले असून कोरोनाचा प्रादुर्भावही नगण्य स्वरूपात राहीला असल्याने यंदाची आषाढ वारी उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने आषाढवारीसाठी पालखी सोहळ्यांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत.

२० जून रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर २१ जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड उत्साहाने वारकरी देहू नगरीत दाखल होतील, अस देहू संस्थानाकडून सांगण्यात येत आहे.

मागील दोन वर्षांपासून देशात करोना संकट असल्याने नियम व अटींचं पालन करून हा पालखी सोहळा पार पडला होता. गेल्यावर्षी एसटीने या दोन्ही पालख्या सन्माने निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरला गेल्या होत्या. पण यावर्षी करोना संकट काहीसं कमी झालं झालं आहे. त्यामुळे सध्या देहू आणि आळंदी येथे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगद्गुरू संत तुकोबांची पालखी २० जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.

यावर्षी करोनाच संकट काहीसं कमी झालं आहे. पालखी सोहळ्याची तारीख जाहीर झाल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अखेर दोन वर्षानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय, त्यामुळे लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत दाखल होतील, अशी माहिती माणिक महाराज मोरे यांनी दिली.

२० जून रोजी तुकोबांच्या पालखीचं पंढरपूकडे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. आषाढी एकादशीला म्हणजे १० जुलै रोजी तुकोबांची पालखी पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *