Breaking News

सामाजिक

१० वी १२ वीच्या परिक्षार्थींसाठी शिक्षण मंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील काही भागात १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या परिक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घ्या नाहीतर थेट रद्द करण्याची मागणी केली. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही …

Read More »

अखेर १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच: मात्र विद्यार्थ्यांना या गोष्टींची सवलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या, रद्द करा या मागण्यांवरून दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईसह, उस्मानाबाद, नागपूर सह अनेक जिल्ह्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परिक्षा पुढे ढकलणार का? ऑनलाईन घेणार का? याबाबत उत्सकुता निर्माण झाली होती. मात्र परिक्षा नियोजित वेळेत आणि …

Read More »

राज्य शासनाकडून या साहित्यिक आणि प्रकाशन संस्थांना वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

मराठी ई-बातम्या टीम राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आलाआहे. पाच लाख रु.रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील   यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी)  मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी खालील प्रमाणे. अ.क्र. पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नाव पुरस्काराचे स्वरुप अनुभव/कार्य 1. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 श्री. भारत सासणे रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 …

Read More »

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा रयतचे विश्वस्त एन.डी.पाटील यांचे निधन ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील शेतकरी कामगार पक्षातून सत्तेच्या हव्यासापायी अनेक जणांनी इतर पक्षात प्रवेश करत सत्ता उपभोगली. मात्र शेकापच्या विचारावर अढळ निष्ठा ठेवत शेवटपर्यत शेकापमध्ये रहात विविध सामाजिक लढ्यात आपले योगदान देणारे प्रा.एन.डी.पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी कोल्हापूरात निधन झाले. मागील दिवसापासून त्यांची तब्येत ठिक नसल्याने पाटील यांच्यावर उपचार …

Read More »

देहविक्री करणाऱ्या महिलांनाही मिळणार शिधापत्रिका नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमातंर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडित महिलांना तसेच देहविक्री व्यवसायातील महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. वेश्या व्यवसाय, बालवेश्या व वेश्यांचा मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीच्या सुचनेनुसार त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी: शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीच्या अर्जासाठी मुदतवाढ पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीच्या आत अर्ज करण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. त्याचबरोबर २०२० – २१ या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील …

Read More »

अनाथांच्या डोक्यावरची असलेली सिंधूताई नावाची छत्रछाया हरविली वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम आपल्या वैयक्तीक आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांना मायेच्या झऱ्यात परिवर्तित करून हजारो अनाथ मुलांच्या डोक्यावर मायेची छत्रछाया धरणाऱ्या आणि त्यांच्यासाठी आयुष्यभर वटवृक्ष बनणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे आज पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी रात्री ८ वाजता निधन झाले. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं …

Read More »

महिला शिक्षणातील अग्रणी.. सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा खास लेख

 महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती. यानिमित्त त्यांच्या महिला शिक्षणक्षेत्रातील कार्याची ही थोडक्यात आठवण.. स्वातंत्र्यपूर्व शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रूढी परंपरांचा काळ होता. …

Read More »

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस सणासाठी गृह विभागाने जाहीर केले हे नियम साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात

मराठी ई-बातम्या टीम नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमायक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन …

Read More »

शोध पत्रकारीता गायब होतेय, सगळंच आलबेल असल्याचं दाखवलं जातेय सरन्यायाधीश एन.व्ही रमण यांनी व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम आम्ही जेव्हा तरूण होतो तेव्हा आम्हाला वर्तमानपत्रांमध्ये घोटाळे समोर आणलेले वाचण्याची उत्सुकता असायची. तेव्हा वर्तमानपत्रांनी आम्हाला कधीही निराश केलं नाही. मात्र, सध्या आपल्या अवतीभवती सर्वकाही आलबेल आहे असंच दाखवलं जातंय. त्यामुळे या विषयावर तुम्ही स्वतःच तुमची मतं बनवावी असं सांगून मी याबाबतचा निर्णय तुमच्यावर सोपवतो असे सांगत …

Read More »