Breaking News

विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी: शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीच्या अर्जासाठी मुदतवाढ पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीच्या आत अर्ज करण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम

महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

त्याचबरोबर २०२० – २१ या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती, परिक्षा फी, शिक्षण फी माफीसाठीचे अर्ज अद्याप भरता आले नाहीत. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ३१ जानेवारीपर्यतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे ४.७० लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास १२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.

काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दिनांक १२ जानेवारीपर्यंत केवळ १.१६ लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचाच विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *