Breaking News

सामाजिक

स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बालसाहित्य मेळाव्याची परंपरा यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनातही सुरू राहील - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

मराठी ई-बातम्या टीम मराठी साहित्य संमेलनाच्या याआधीच्या ९३ संमेलनात जे उपक्रम राबविले गेले नाही असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राबविण्यात येत आहे. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या इतिहासात बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला. बालसाहित्य मेळाव्याची ही …

Read More »

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात भव्यदिव्य ग्रंथदिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत

मराठी ई-बातम्या टीम कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात भव्य ग्रंथदिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी …

Read More »

काँग्रेसच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता, कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५० हजार रू. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येणार सानुग्रह सहाय्य

मुंबई : प्रतिनिधी कोविड काळात मृत्यूमुखी पावणाऱ्यांच्या वारसांना मदत काय देणार असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केल्यानंतर त्या वारसांना ५० हजार रूपयांची मदत देण्याची ग्वाही मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्राने राज्याला पत्र पाठविल्यानंतर ५० हजार ही फारच तुटपुंजी रक्कम असून त्याऐवजी ४ लाख रूपयांची …

Read More »

Iloveyou, sweetheart पासवर्डबाबत जाणून घ्या रंजक गोष्टी भारतीयांची पसंती या पासवर्डला

मुंबई: प्रतिनिधी आपण स्मार्टफोन, ई-मेल, सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग आदींसाठी पासवर्डचा वापर करतो. खूप पासवर्ड असल्यामुळे आपण सोपे पासवर्ड तयार करतो. या पासवर्डबाबतच रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक लोक ‘123456’ सारखे पासवर्ड सर्वात जास्त वापरतात असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण असं अजिबात होत नाही. भारतात सर्वात लोकप्रिय पासवर्ड ‘password’ …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवभक्त आणि पुणेकरांकडून अखेरचा निरोप वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने भारावून जात केवळ शिवचरित्राची माहिती प्रसारीत करण्याचे काम अखेरपर्यंत करत राहणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना शिवभक्त आणि पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली होती. …

Read More »

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारले जाणार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार १२ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, …

Read More »

आठवलेंच्या पाठराखण आणि वानखेडेंच्या दाव्याला आंबेडकरी संघटनांचा विरोध वानखेडे तुम्ही आंबेडकरवादी नाहीत, खोटा प्रचार करू नका

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यात गाजत असलेला समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीमध्ये हिंदू दलित समाजाचे कार्ड वापरून आज पुन्हा वानखेडे परिवाराने रिपाइं नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांची भेट घेवून आम्ही आंबेडकरीवादी आहोत, असे घोषित केले. परंतु एवढया दिवसात हे कुटुंब हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत …

Read More »

आयदानकार उर्मिला पवार यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार सम्यक साहित्य संसदच्यावतीने पुरस्कार जाहिर

मुंबईः प्रतिनिधी वाङमयीन परिवर्तनवादी चळवळीत अग्रेसर रहात, सातत्यपूर्ण रचनात्मक कार्यक्रम करून मराठी वाङमयीन क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करणार्‍या सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध लेखिका, आयदानकार उर्मिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. परिवर्तनवादी कवितेचे …

Read More »

अनुवादकांना संधी: मानधन तत्वावर मिळणार रोजगार भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अनुवादकांनी  आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज, नवी नोकरी मिळणार १ ऑक्टोंबरपासून मिळणार नवा नोकर

मुंबई: प्रतिनिधी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार एक्सचेंज सुरू करणार आहे. या एक्सचेंजद्वारे ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे एक्सचेंज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल. देशात प्रथमच …

Read More »