Breaking News

अनुवादकांना संधी: मानधन तत्वावर मिळणार रोजगार भाषा संचालनालयाकडून अनुवादकांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

प्रशासकीय, कायदेविषयक, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून भाषा संचालनालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक अनुवादकांनी  आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत ५ वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ या पत्त्यावर दि. १० नाव्हेंबर २०२१ पर्यंत पाठवावेत. असे भाषा संचालक, यांनी कळविले आहे.

कोण अर्ज करु शकेल?

  • अनुवादकास प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी पर्यावरण, संगणक तंत्रज्ञानयापैकी एक किंवा त्याहून अधिक विषयांचा अनुवाद करण्याचा अनुभव असावा.
  • अनुवादकास मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • ज्या व्यक्तींनी उपरोक्त एक किंवा अनेक विषयांमध्ये स्वतः अनुवाद करून पुस्तके प्रकाशित केली आहेत अशा व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.
  • अनुवादकास पुरेसे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुवाकाकडे इंटरनेटसह संगणकाची सुविधा असावी,
  • मराठी/इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी/पदवी/अनुवाद पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.

कामाचे स्वरुप तसेच अटी व शर्ती

  • नामिकेतील तज्ज्ञ अनुवादकांना अनुवादांची कामे शासनाच्या विविध विभाग, मंडळे. महामंडळे यांच्याकडून परस्पर पाठविण्यात येतील तसेच संबंधित विभाग व कार्यालय आणि तज्ज्ञ अनुवादक यांच्यामध्ये ठरविण्यात येईल अशा कालावधीत ही कामे नामिकेतील अनुवादकांना विहित मुदतीत पूर्ण करून द्यावी लागतील.
  • नामिकेतील अनुवादकांना शासन वेळोवेळी निश्चित करील त्या मानधन दरानुसार मानधन अनुज्ञेय राहील.
  • अनुवादकाने अनुवादित केलेल्या अनुवादाच्या अचुकतेची जाबाबदारी सर्वस्वी संबंधित अनुवादकाची राहील.
  • अनुवादकांनी त्याच्या कामाचा सहामाही अहवाल विहित नमुन्यात या कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक राहील.
  • नामिकेतील तज्ज्ञांना त्यांची अचूकता कार्यक्षमता व कार्यतत्परता विचारात घेऊन वगळण्याचा तसेच नामिकेत नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचा अधिकार या कार्यालयाचा राहील.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *