Breaking News

कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच, एप्रिलमध्येही सुरु राहणार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती

कोरोना काळात शाळा बंद राहील्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान शैक्षणिक नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यंदा शाळांना मिळणारी उन्हाळा सुट्टी जवळपास रद्द करण्यात आली असून एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही.
कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षाच्या काळात अवघे काही दिवस शाळा सुरु राहिल्या. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, त्यालाही अनेक मर्यादा असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. तसेच विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले. अशावेळी शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांचा कस लागत असल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरु ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांमध्येही अभ्यास करावा लागणार आहे.
मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पालकांना फिरण्याचे वेध लागतात. मागील दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळेही अनेक कुटुंब घरातच अडकून पडली होती. यंदा कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. तसेच सरकारकडून अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. अशावेळी यंदा पालकांनी मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की फिरण्याचे बेत आखले होते. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्याचा निर्णय शाळेल शिक्षण विभागाने घेतला.

Check Also

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि होणार आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार

राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होणार आहेत. त्यांचा कायापालट …

Leave a Reply

Your email address will not be published.