Breaking News

डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मोठी माहिती बाहेर, साक्षीदाराने हल्लेखोरांना ओळखले २०१३ नंतरची मोठी घडामोड

२० ऑगस्ट २०१३ रोजी भल्या सकाळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यास जवळपास तब्बल ९ वर्षानंतर यातील महत्वाचा दुआ हाती आला असून या प्रकरणातील आरोपींना साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्याची माहिती पुढे येत आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखले आहे. दाभोळकरांच्या खुनप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना अटक केली. तसेच या दोघांमध्ये झालेले संभाषण आणि या दोघांना पुरविण्यात आलेली शस्त्राच्या आधारे पोलिसांनी चांगल्यापैकी माहिती गोळा केली होते. या दोघांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले असून अंदुरे आणि कळस्कर या दोघांनीच दाभोळकरांवर गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचे या साक्षीदाराने आपल्या जबानीत सांगितल्याच सांगण्यात येत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी ७ च्या सुमारास गोळ्या घालून त्यांची हत्या झाल्याची घटना घडली. त्यावेळी त्या पुलावर साफ सफाई करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आले आणि कावळ्यांचा आवाज देखील आला. साक्षिदार तिकडे पाहत असताना, एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या,व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो, अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितल्याचे सांगण्यात येत आहे.

आता पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. तसेच विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड.ओंकार नेवगी यांनी कामकाज पाहिले आहे. बचाव पक्षाकडून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले

२०१३ साली डॉ.दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटले. याप्रकरणी सनातन संस्थेच्या दोघांना अटकही करण्यात आली. परंतु हल्लेखोरांना पाहिल्याची प्रत्यक्षदर्शी माहिती पुढे येत नव्हती. अखेर यासंदर्भात घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या एकाने अखेर या दोन्ही हल्लेखोरांना ओळखल्याची जबानी न्यायालयात दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *