Breaking News

अर्थविषयक

रिझर्व्ह बँकेच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांवर कर्जाचा बोजा वाढणार रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातच पेट्रोल-डिझेल आणि गॅससह जीवनाश्वय वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आज अचानक रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे ईएमआयधारक असलेल्या कर्जदारांवरील कर्जाच्या आर्थिक बोजामध्ये वाढ होणार आहे. गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी, रेपो दरात …

Read More »

गॅसच्या किंमतीत पुन्हा १०० रूपयाहून अधिक वाढ, बाहेरचे खाणं महागणार हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाण्याचे पदार्थ महागण्याची शक्यता

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पहिल्यांदाच राज्यां विरूध्द थेट विरोधाची भूमिका घेतली. मात्र त्याचाच विसर कदाचित केंद्र सरकारला पडला असण्याची शक्यता असून व्यासायिक गॅसच्या किंमतीत तब्बल १०२.५० पैशाची वाढ करण्याचा निर्णय गॅस …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर ऊर्जेबाबत घेतला “हा” निर्णय पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे …

Read More »

ज्वेलरी मशिनच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर ‘ज्वेलरी मशिनरी ॲण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित …

Read More »

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून उद्योजकांना इथे यावेसे वाटेल अशा सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष …

Read More »

सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी तर पाईपद्वारे गॅस प्रति एससीएम ३.५० रुपयाने स्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायुवरील करात थेट १०.५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार यासंदर्भातील आदेश जारी करत आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात …

Read More »

२ लाख २० हजार छोटे- इतर व्यापाऱ्यांना होणार फायदा, ‘या’ योजनेचा लाभ घेतल्यास “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२ योजने”ची अधिसूचना जारी

कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ या अभय योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्याने राज्यातील उद्योग, …

Read More »

निधी पळविल्याप्रकरणी सेबीचा अनिल अंबानीवर ठपका घेतला राजीनामा दोन कंपन्याच्या संचालक पदांचा दिला राजीनामा

रोखे बाजारातून पैसे पळविल्याप्रकरणी सेबीने रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना कंपनीशी कोणत्याही प्रकारे संबध ठेवण्यास प्रतिबंध घातल्याने अखेर कंपनीच्या दिवाळखोरीमुळे चर्चेत असलेले आणि रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी दोन कंपन्याच्या संचालक पदाचे राजीनामे दिल्याची माहिती पुढे आली आहे. रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि …

Read More »

व्यापाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केली “ही” अभय योजना ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२’ अभय योजना

कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ अभय योजना आज विधिमंडळात जाहीर केली. कर कायद्यातंर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये १० हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ …

Read More »

भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या व्याज दरात घट गुवहाटी येथील सभेत घेतला निर्णय

नोकरीवर असताना भविष्यकालीन तरतूद म्हणून आपल्या वेतनातून काही ठराविक रक्कम केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होते. तसेच वेतनातून कपात होणाऱ्या रकमे इतकीच रक्कम संबधित कंपनी किंवा सरकारकडून जमा करण्यात येते. या जमा होणाऱ्या रकमेवर केंद्र सरकारकडून आतापर्यत चांगले व्याज देण्यात येत होते. परंतु यंदा या व्याजात घट करण्याचा निर्णय …

Read More »