२ हजार रुपयांच्या नोटा आजही बाजारात आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार २ हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात अजूनही १० हजार कोटी रुपये लोकांकडे आहेत. या नोटा लवकरच बँकांमध्ये जमा होतील, अशी आशा आरबीआय गव्हर्नर यांनी व्यक्त केली आहे. २ हजार रुपयांची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. …
Read More »चीनमध्ये जन्मदर घटल्याने ही कंपनी बंद करणार आपला कारखाना चीनचा जन्मदर घटल्यामुळे आयर्लंड स्थित कंपनीचा नेमका तोटा काय ?
जगातील सर्वात मोठी फूड कंपनी नेस्ले बेबी फॉर्म्युला बनवणारी कंपनी आपला एक प्लांट बंद करणार आहे. याचे कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कंपनीचे म्हणणे आहे की चीनमध्ये जन्मदर घटला आहे. कंपनीचे हे प्लांट आयर्लंडमध्ये असून ते मुलांसाठी न्यूट्रिशन फॉर्म्युला तयार करते. हे विशेषतः आशियामध्ये निर्यात केले जाते.कंपनीचे म्हणणे आहे की …
Read More »दोन कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना लाभांशाची घोषणा या दोन कंपन्यांकडून जाहिर
जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी अनेक कंपन्या रोज निकाल जाहीर करत आहेत. यामधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना आकर्षक लाभांशही देण्याची घोषणा केली आहे. आता आणखी दोन कंपन्यांनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना लाभांश जाहीर केला आहे. जिंदाल स्टेनलेस आणि रामकृष्ण फोर्जिंग्स या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देणार आहेत. …
Read More »नोकिया देणार इतक्या कर्मचाऱ्यांना नारळ; हे दिल आहे कारण ? गूगल नंतर नोकिया करणार 'इतके' कर्मचारी कपात
कोविड पासून संपूर्ण देशावर मंदीचं सावट आहे. त्याचा परिणाम मोठ्या कंपन्यांमध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या कपात होणाऱ्या स्वरूपात दिसून येतो. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कंपन्या हजारो लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. या यादीत जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल ते फेसबुकची मूळ कंपनी मेटाचा सुद्धा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या …
Read More »Vistara Airlines : व्हीलचेअर नाकारल्या बद्दल दोन आजारी महिला प्रवाशांनी विस्तारा विरुद्ध केला 20 कोटींचा दावा विस्ताराच्या लक्षात आणून दिल्यावर, कोलंबोमधील एअरलाइनच्या कंट्री हेडने मागितली माफी
मुंबई: लँडिंगनंतर व्हीलचेअर नाकारल्याबद्दल संतप्त झालेल्या दोन महिला प्रवाशांनी एअरलाइनवर प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा स्वतंत्र खटला दाखल केला आहे. 14 सप्टेंबर रोजी कोलंबो ते मुंबई असा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये मोनिका गुप्ता (49) आणि तिची आई उषा एम. गुप्ता (81) आहेत. मोनिकाचा भाऊ मुधित गुप्ता याने मुंबईच्या ग्राहक विवाद …
Read More »ऑन डोअर कॉन्सेप्टचा आयपीओ २३ ऑक्टोबरला उघडणार इतकी आहे प्राईस बँड
मध्य प्रदेश स्थित ओमनी-चॅनल रिटेलर ऑन डोअर कॉन्सेप्टचा आयपीओ २३ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. कंपनी या आयपीओतून ३१.१८ कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ २७ ऑक्टोबरपर्यंत खुला आहे. ऑक्टोबरमध्ये एसएमई विभागातील हा पाचवा आयपीओ आहे. ऑन डोअर कॉन्सेप्टने आयपीओसाठी प्रति शेअर २०८ रुपये किंमत निश्चित केली आहे. आयपीओअंतर्गत १४.९८ …
Read More »हिंदुस्तान युनिलिव्हरकडून गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा लाभांश कंपनीने दुसऱ्या तिमाहीते निकाल सादर केले
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हरचा स्वतंत्र निव्वळ नफा वार्षिक आधारावर ३.८६ टक्क्यांनी वाढून २,७१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसूलही ३.५३ टक्क्यांनी वाढून १५,०२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत २,६७० …
Read More »६ हजार प्रकरणांमध्ये ५७ हजार कोटींची जीएसटी चोरी उघड ५०० जणांना अटक
जीएसटी गुप्तचर महासंचालनालय जीएसटी चोरी शोधण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत, विभागाने मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत ५७,००० कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात ५०० जणांना अटकही करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालय गेल्या तीन वर्षांपासून …
Read More »नेस्ले प्रथमच करणार स्टॉक स्प्लिट १४० रुपये लाभांशही देणार
स्विस कंपनी नेस्लेचे भारतीय युनिट नेस्ले इंडिया प्रथमच आपले शेअर्सचे विभाजन करणार आहे. याशिवाय कंपनीने आर्थिक निकालांसह लाभांशही जाहीर केला. नेस्ले इंडियाने गुरूवारी आपले दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. यावेळी नेस्ले इंडियाने लाभांशही जाहीर केला आहे. नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १४० रुपये या दुसऱ्या …
Read More »सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर; दसरा दिवाळीच्या तोंडावर मोजावे लागणार अधिक पैसे
जागतिक घडामोडींचे परिणाम आता सोने-चांदीवर दिसून येत आहे. मध्य-पूर्वेतील अशांतता, युक्रेन-रशियात १९ महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध याचा परिणाम आता सोन्या चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्यात सोने-चांदीने पहिला क्रमांक लावला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीने उच्चांकी झेप घेतली होती. पण मंगळवारी किंमतीत मोठी घसरण …
Read More »