Breaking News

अर्थविषयक

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ६१ हजारांच्या वर, ५३३ अंकांची नोंदवली वाढ

मराठी ई-बातम्या टीम या आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३३ (०.८८%) अंकांनी वाढून ६१,१५० वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी (०.८७%) वाढून १८,२१२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग वाढीसह बंद झाले, तर ६ समभाग घसरणीसह …

Read More »

करदात्यांसाठी चांगली बातमी: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवली १५ मार्चपर्यंत आता आयटीआर दाखल करता येणार

मराठी ई-बातम्या टीम केंद्राने २०२०-२१ साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. मात्र, ही मुदत केवळ कॉर्पोरेटसाठी वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ कॉर्पोरेट्स मार्चच्या मध्यापर्यंत आयकर रिटर्न भरू शकतात. टॅक्स ऑडिट रिपोर्ट्स आणि ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट रिपोर्ट्स दाखल करण्याची अंतिम मुदतही १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. …

Read More »

व्होडाफोन-आयडीयाचे आता केंद्र सरकारबरोबर Together For Tomorrow थकीत रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या बदल्यात भागीदारी

मराठी ई-बातम्या टीम एकाबाजूला भाग भांडवल उभारण्यासाठी आणि महसूली तूट भरून काढण्यासाठी सरकारी मालकीच्या कंपन्या विकण्याचे धोरण केंद्र सरकारने स्विकारले असताना दुसऱ्याबाजूला मात्र व्होडाफोन आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीकडून सरकारला मिळणाऱ्या थकबाकी पोटी थेट भागीदारीच स्विकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. व्होजाफोन आयडीया कंपनीकडे स्पेक्ट्रम खरेदीतील थकबाकी आणि त्यावरील व्याजाची …

Read More »

म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक डिसेंबरमध्ये १२ लाख नवीन खाती

मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंड उद्योगाला सध्या चांगले दिवस येत आहेत. गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे.  या क्षेत्रात येणारी गुंतवणूक याची पुष्टी करत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक ११,३०५ कोटी रुपयांची झाली आहे. म्युच्युअल …

Read More »

बँक कर्मचारी पुन्हा संपावर : या दिवशी करणार संप २३,२४ फेब्रुवारीला संपावर

मराठी ई-बातम्या टीम बँक कर्मचारी २३ आणि २४ फेब्रुवारीला पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. सेंट्रल ट्रेड युनियन्स (CTU) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (AIBEA) सह इतर संघटनांनी संयुक्तपणे बँक संपाची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी …

Read More »

आजपासून सॉवरेन गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूकीची संधी १ ग्रॅम सोन्याची किंमत ४,७३६ रुपये

मराठी ई-बातम्या टीम तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. सॉवरेन सुवर्ण बाँड योजना २०२१-२२ अंतर्गत, १० ते १४ जानेवारी दरम्यान सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. सरकारने यावेळी सॉवरेन …

Read More »

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर शुल्क वाढवले आहे. आता शहरी भागातील ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. १५ जानेवारीपासून सर्व शुल्क लागू होतील, असे त्यात म्हटले आहे. …

Read More »

रिलायन्स जिओचा आयपीओ येणार, मूल्यांकन १०० अब्ज डॉलर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावर्षी (आयपीओ) IPO आणू शकते. आयपीओचे मूल्यांकन ७.४० लाख कोटी म्हणजेच १०० अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. ह्या आयपीओच्या लिस्टिंगनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही समूहातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल. परदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने जिओ या वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते, असा …

Read More »

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना भेट देण्याची तयारी करत आहे. मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे किमान मासिक पेन्शन १,००० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास ईपीएसशी संबंधित लोकांना लवकरच ९,००० रुपये पेन्शन मिळेल. कामगार मंत्रालय फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊ …

Read More »

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने २०२०-२१ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, एकूण ११.०१ लाख दावे कंपन्यांना वैयक्तिक जीवन विमा प्रकरणी प्राप्त झाली होती. यापैकी आयुर्विमा कंपन्यांनी १०.८४ लाख दावे भरले. या दाव्यांची रक्कम …

Read More »