Breaking News

मापन यंत्रे बनवणाऱ्या हॉलमार्कचा आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडला, जाणून घ्या तपशील १५ सप्टेंबर अर्थात आज ओपन झाला

वैज्ञानिक आणि मापन यंत्रे बनवणाऱ्या हॉलमार्कचा आयपीओ १५ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. कंपनी आयपीओतून ११ कोटी रुपये उभारणार आहे.

आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत ४० रुपये आहे. तर गुंतवणूकदार ३००० शेअर्सच्या लॉटमध्ये गुंतवणूक करू शकतात. शेअर्सचे वाटप २५ सप्टेंबर रोजी केले जाईल. तर लिस्टींग २८ सप्टेंबर रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर होईल. आयपीमध्ये २८.५० लाख इक्विटी शेअर्स जारी करण्याची योजना आहे. या शेअर्सच्या विक्रीतून जमा होणारा पैसा नवीन प्लांट आणि यंत्रसामग्रीसाठी, खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि आयपीओ संबंधित खर्चासाठी वापरला जाईल.

हॉलमार्क ही केरळस्थित कंपनी १९९३ पासून संशोधन, उद्योग आणि शिक्षणासाठी वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी उपकरणे तयार करत आहे. ही कंपनी इमेजिंग इन्स्ट्रुमेंट्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, स्पेक्ट्रोस्कोपी, अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स, लॅब इन्स्ट्रुमेंट्स, फिजिक्स लॅब इन्स्ट्रुमेंट्स, ब्रेडबोर्ड/टेबल टॉप्स, ऑप्टो-मेकॅनिक्स, ऑप्टिक्स, लीनियर आणि रोटेशन स्टेज, मोटाराइज्ड लीनियर आणि रोटेशन स्टेज आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन इ. डिझाइन आणि उत्पादन करते.

कंपनीचा परिचालन महसूल आर्थिक वर्ष २०२१ मधील १५.७३ कोटी रुपयांवरून २०२२ मध्ये २१.१८ कोटी रुपये आणि नंतर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २९.१८ कोटी रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत निव्वळ नफा देखील आर्थिक वर्ष २०२१ मधील ६८.८० लाख रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १.५५ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३.५६ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

Check Also

आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, गोल्ड बाँडची दुसरी मालिका खुली दुसरी मालिका ११ सप्टेंबरपासून सुरु

आजपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून स्वस्त सोने खरेदी संधी आरबीआयने उपलब्ध करून दिली आहे. सार्वभौम सुवर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *