Breaking News

अर्थविषयक

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात नकारात्मक महागाई दर सलग सहाव्यांदा घटला

खाद्यपदार्थांच्या घसरणीमुळे सप्टेंबर महिन्यात भारताची घाऊक महागाई दर -०.२६ टक्के राहिला आहे. घाऊक महागाई शून्याच्या खाली गेलेला हा सलग सहावा महिना आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर -०.५२ टक्के तर जुलैमध्ये -१.३६ टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाची आकडेवारी जाहीर केली. घाऊक महागाई नकारात्मक झोनमध्ये राहिलेला हा सलग सहावा महिना …

Read More »

या आठवड्यात गुंतवणूकदारांना या कंपन्या देणार लाभांश टीसीएस, टाटा समूह या कंपन्यांसह या कंपन्याकडून वाटप

चालू आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही पूर्ण झाली असून तिसरी तिमाही ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. यासोबतच शेअर बाजारातील कंपन्यांच्या नव्या तिमाही निकालांचा हंगामही सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात, टाटा समूहाच्या टीसीएसने नवीन निकालांचा हंगाम सुरू केला. आता नवीन आठवड्यात लाभांशाची प्रक्रिया सुरू होत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन कमाईच्या संधी खुल्या …

Read More »

चालू आठवड्यात या कंपन्या जाहीर करणार तिमाही निकाल, पहा यादी या कंपन्या जाहिर करणार तिमाही निकाल

या आठवड्यात म्हणजेच १६-२१ ऑक्टोबर दरम्यान अनेक बँका आणि कंपन्यांचे जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, सीएट, विप्रो, बजाज ऑटो आदी कंपन्यांचा समावेश आहे. तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या सर्व कंपन्यांची यादी जाणून घेऊया. या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार १६ ऑक्टोबर …

Read More »

खुषखबर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयातीवर बंदी हटविली हार्डवेअर उद्योगाच्या दबावामुळे सरकारने निर्णय मागे घेतला

भारतीयांसाठी एक खुषखबर असून लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या आधीच्या निर्णयापासून केंद्र सरकार मागे हटले आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या …

Read More »

परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घसरण सलग पाचव्या आठवड्यात घट, कारण जाणून घ्या

देशाचा परकीय चलन साठा ६ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात, देशाचा एकूण चलन साठा ३.७९ अब्ज डॉलरने घसरून ५८६.९१ अब्ज डॉलर झाला. ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलन साठ्याने ६४५ अब्ज डॉलर …

Read More »

कोणती गुंतवणूक फायद्याची? महिला सन्मान बचत की सुकन्या समृद्धी योजना जाणून घ्या महिला आणि मुलींसाठी योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष बचत योजना जाहीर केली होती. ही योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. ही एक छोटी बचत योजना आहे, जी खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. त्यापैकी एका योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. अशा …

Read More »

भारताची व्यापार तूट घटली ५ महिन्यांतील सर्वात कमी तूट

आर्थिक आघाडीवर दिलासा देणारी बातमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या व्यापार आकडेवारीनुसार भारताची व्यापार तूट कमी झाली आहे. व्यापार तूट ५ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. आयात कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताची व्यापारी व्यापार तूट सप्टेंबरमध्ये १९.३७ अब्ज डॉलरवर घसरली. ही तूट पाच महिन्यांतील सर्वात कमी आहे. ऑगस्टमध्ये व्यापार तूट …

Read More »

एचसीएल टेककडून भागधारकांना लाभांश जाहीर १० रूपयांचा प्रति लाभांश

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. गुरूवारी एचसीएल टेकने आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या …

Read More »

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी, औद्योगिक उत्पादनात वाढ ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात मोठी वाढ

ऑगस्ट महिन्यात देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) १०.३ टक्क्यांनी वाढले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाद्वारे मोजले जाणारे औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षी याच महिन्यात ०.७ टक्क्यांनी घसरले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन ९.३ टक्क्यांनी …

Read More »

इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीचे निकाल केले जाहीर लाभांशाचीही घोषणा

देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालांनुसार, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक ३.१ टक्क्यांनी वाढून ६,२१५ कोटी रुपये झाला आहे. तिमाही निकाल जाहीर करताना इन्फोसिसने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. …

Read More »