देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने गुरूवारी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालांनुसार, सप्टेंबर २०२३ च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक ३.१ टक्क्यांनी वाढून ६,२१५ कोटी रुपये झाला आहे.
तिमाही निकाल जाहीर करताना इन्फोसिसने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. कंपनीने अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख २५ ऑक्टोबर २०२३ आणि पेमेंटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ निश्चित केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या लाभांशात ९.१ टक्के वाढ झाली आहे.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत इन्फोसिसचा नफा वार्षिक आधारावर ३.१२ टक्क्यांनी वाढून ६२१२ कोटी रुपये झाला आहे. यामुळे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ६०२१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तिमाहीत इन्फोसिसचा महसूल ३८,९९४ कोटी रुपये होता आणि त्यात ७ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
इन्फोसिसने त्यांचे ऑपरेटिंग मार्जिन मार्गदर्शन २० ते २२ टक्क्यांच्या दरम्यान ठेवले आहे. कंपनीने संपूर्ण वर्षासाठी १ टक्के ते २.५ टक्क्यांच्या दरम्यान महसूल वाढीचा अंदाज ठेवला आहे. यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. याआधी महसूल वाढीचा अंदाज १ टक्के ते ३.५ टक्के ठेवण्यात आला होता.
तिमाही निकाल जाहीर होण्यापूर्वी इन्फोसिसच्या शेअर्सवर दबाव होता. शेअर्स गुरूवारी 3 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. शेअर बाजार बंद होताना इन्फोसिसचे शेअर्स ४२.१० रुपयांनी घसरून १,४५२.३० रुपयांवर बंद झाला. मात्र, आजचे निकाल बाजाराच्या अंदाजाच्या जवळ असल्याने शुक्रवारी शेअर्समध्ये चांगली सुरुवात दिसू शकतो.