Breaking News

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते.

खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा दर ४.६५ टक्क्यांवर आला होता जो ऑगस्टमध्ये ६.५९ टक्के होता. ग्रामीण भागातील महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ५.३३ टक्क्यांवर आला आहे, जो ऑगस्टमध्ये ७.०२ टक्के होता.

महागाई कुठे वाढली आणि कुठे कमी झाली?

– सप्टेंबरमध्ये डाळींची महागाई ११.८५% वरून १०.९५% पर्यंत घसरली.
– सप्टेंबरमध्ये मांस आणि माशांची महागाई ३.६८% वरून ४.११% पर्यंत वाढली आहे.
– सप्टेंबरमध्ये अंडी महागाई ४.३१% वरून ६.६४२% वर पोहोचली.
– दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर सप्टेंबरमध्ये ७.७३% वरून ६.८९% पर्यंत घसरला.
– भाज्यांची महागाई ऑगस्टमधील २६.१४ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये ३.३९ टक्क्यांवर घसरली.
– इंधन आणि विजेचा महागाई दर सप्टेंबरमध्ये ४.३१% वरून -०.११% पर्यंत घसरला.

आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाई दराचा अंदाज
या महिन्यात झालेल्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीची माहिती देताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाईचा अंदाज ५.४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. मागील बैठकीत ते ५.१ टक्क्यांवरून ५.४ टक्के करण्यात आले. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, सप्टेंबरमध्ये महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे.

Check Also

पेटीएम, IIFL बँक आणि आता कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची बंधन एकदम तीन बँकावर लादलेली बंधन सारखीच

भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *