Breaking News

Tag Archives: महागाई

एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाईमचा दर ४ महिन्यांच्या उच्चांकावर

भारतीय ग्राहकांना एप्रिलमध्ये अन्नधान्याच्या किमतीत आणखी वाढ झाली, जरी एकूण किरकोळ महागाई दर मार्चमधील ४.८५% वरून गेल्या महिन्यात ४.८३% वर अक्षरशः अपरिवर्तित राहिला. अन्नधान्य चलनवाढीचा दर एप्रिलमध्ये ८.७% या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, जो मार्चमधील ८.५% होता, ग्रामीण ग्राहकांमध्ये ८.७५% ची तीव्र वाढ दिसून आली. शहरी आणि ग्रामीण ग्राहकांच्या …

Read More »

प्रियंका गांधी यांचा सवाल,… तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?

देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र …

Read More »

महागाईमुळे थंडावलेला आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा उभारी घेण्याचा अंदाज जागतिक व्यापार संघटनेची अपेक्षा

मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीयस्तरावर असलेली आर्थिक अनिश्चितता आणि दोन देशातील सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाईत मोट्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात एकप्रकारचे थंडावलेपण आले होते. परंतु जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आशावादी दृष्टिकोन देत २०२४ मध्ये जागतिक व्यापार दृष्टिकोनासाठी आपला अंदाज जारी केला. अहवालानुसार, २०२५ साठी …

Read More »

निवडणूक आणि सणासुदीच्या काळात डाळ, तांदूळ महागले डाळी ३८ टक्क्यांनी महाग तर तांदूळही महागला

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास आला असला, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका वर्षात तूर डाळ जवळपास ३८ टक्क्यांनी महागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव १५० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. महागड्या साखरेमुळे साखरेचा …

Read More »

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …

Read More »

ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर भाज्यांच्या कमी किमतीमुळे घसरण

ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर आली. यापूर्वी जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. भाज्यांच्या कमी दरामुळे महागाईत ही घसरण झाली आहे. मात्र, चलनवाढीचा दर अजूनही आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी चलनवाढीचा दर ६.५९ टक्क्यांवर आला …

Read More »

काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …

Read More »

नऊ वर्षातील महागाईः टोमॅटोच्या सुरक्षेसाठी भाजी विक्रेत्याने ठेवले बॉऊन्सर टोमॅटो आणि मिर्चीच्या वाढत्या किमतीमुळे विक्रेत्याचा निर्णय

मागील काही दिवसांपासून देशाच्या बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिर्चीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील टोमॅटो आणि मिर्ची जवळपास गायब झाली आहे. तसेच या वाढत्या किंमतीवरून टोमॅटोवर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मीम्सही व्हायरल होत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे टोमॅटो, मिर्चीच्या संरक्षणासाठी चक्क बॉऊन्सर …

Read More »