मागील काही दिवसांपासून देशाच्या बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिर्चीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील टोमॅटो आणि मिर्ची जवळपास गायब झाली आहे. तसेच या वाढत्या किंमतीवरून टोमॅटोवर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मीम्सही व्हायरल होत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे टोमॅटो, मिर्चीच्या संरक्षणासाठी चक्क बॉऊन्सर ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.
मागील काही दिवसांपासून देशात वाढत्या महागाईवर कोणताच राजकिय पक्ष या मुद्यावरून जाब विचारत नाही की केंद्रातील असो की उत्तर प्रदेशातील भाजपाचे योगी सरकार असो त्यांच्याकडूनही दिलासा दिला जात नाही. सध्या टोमॅटोचे दर प्रति किलो १६० रूपयेवर पोहोचले आहेत. त्यामुळे पूर्वी १० ते २० रूपये प्रति किलो टोमॅटोचा दर थेट इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सध्या ५० ग्रॅम १०० ग्रॅम अशा स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांकडून खरेदी करण्यात येत आहे.
यापार्श्वभूमीवर वाराणसी येथील भाजी विक्रेत्याने टोमॅटो आणि मिर्चीची सुरक्षित विक्री करता यावी यासाठी स्टॉलवर चक्क दोन बॉऊन्सर ठेवले आहेत. तसेच या भाजी विक्रेत्याने आपल्या पथपथावरील स्टॉलवर आधी पैसे मग टोमॅटोला हात लावा, मिर्चीला हात लावा असे फलक लावलेले आहेत.
त्याचबरोबर पैसे दिल्याशिवाय टोमॅटोला हात लावायला परवानगी नसल्याचा फलक लावला आहे. तरी ही जर एखाद्या ग्राहकाने टोमॅटो आणि मिर्ची हातात घेण्याचा प्रयत्न केला तर बॉऊन्सर हे लगेच ग्राहकाला थांबवित असल्याचा व्हिडिओत दिसून येत आहे.
विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वाराणसीतील हा प्रकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पीटीआय अर्थात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने व्हिडिओसह यासंदर्भातील बातमी देत ती ट्विटरवरही शेअर केली आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1677975663125340161?s=20