Breaking News

Tag Archives: inflation

मार्च अखेर किरकोळ बाजारातील महागाई दर ४.८५ टक्के ग्राहक किंमत निर्देशांकात महागाई अद्यापही चढ्या क्रमानेच

२०२४ साठी किरकोळ बाजारातील महागाई दर ४% च्या वर राहिली आणि ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्यान्न महागाई मार्च २०२४ मध्ये किरकोळपणे ४.८५% पर्यंत कमी झाली जी एका महिन्यापूर्वी ५.०९% होती. तथापि, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने मोजलेल्या फॅक्टरी आउटपुटसह आर्थिक क्रियाकलाप या वर्षी फेब्रुवारीमध्ये ५.७ % पर्यंत वाढले आहेत, जे चार महिन्यांचा …

Read More »

महागाईमुळे थंडावलेला आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा उभारी घेण्याचा अंदाज जागतिक व्यापार संघटनेची अपेक्षा

मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीयस्तरावर असलेली आर्थिक अनिश्चितता आणि दोन देशातील सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाईत मोट्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात एकप्रकारचे थंडावलेपण आले होते. परंतु जागतिक व्यापार संघटनेने (WTO) आशावादी दृष्टिकोन देत २०२४ मध्ये जागतिक व्यापार दृष्टिकोनासाठी आपला अंदाज जारी केला. अहवालानुसार, २०२५ साठी …

Read More »

फेब्रुवारीत महागाईचा दर ५ टक्क्यावर चलनवाढीचा दर ५.१ टक्क्यावर

फेब्रुवारीमध्ये ग्राहक किमतीवर आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ५ टक्क्यांच्या आसपास बंद होण्याची शक्यता आहे. सरकारचे सांख्यिकी कार्यालय मंगळवारी संध्याकाळी अधिकृतपणे डेटा घोषित करेल. किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीत ५.१ टक्के होता, जो तीन महिन्यांचा नीचांक होता. जर फेब्रुवारीचा अधिकृत आकडा सुमारे ५ टक्के असेल तर याचा अर्थ तो सलग सहा महिने …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर पंतप्रधान एक शब्दही का बोलत नाहीत ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …

Read More »

जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली केंद्रीय बँकांनी ९ महिन्यांत ८०० टन सोने खरेदी केले

चलनवाढ, जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरची सातत्याने होत असलेली मजबूती यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत विक्रमी ८०० टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत १४ टक्के अधिक सोने खरेदी …

Read More »

निवडणूक आणि सणासुदीच्या काळात डाळ, तांदूळ महागले डाळी ३८ टक्क्यांनी महाग तर तांदूळही महागला

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास आला असला, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका वर्षात तूर डाळ जवळपास ३८ टक्क्यांनी महागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव १५० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. महागड्या साखरेमुळे साखरेचा …

Read More »

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात नकारात्मक महागाई दर सलग सहाव्यांदा घटला

खाद्यपदार्थांच्या घसरणीमुळे सप्टेंबर महिन्यात भारताची घाऊक महागाई दर -०.२६ टक्के राहिला आहे. घाऊक महागाई शून्याच्या खाली गेलेला हा सलग सहावा महिना आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर -०.५२ टक्के तर जुलैमध्ये -१.३६ टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाची आकडेवारी जाहीर केली. घाऊक महागाई नकारात्मक झोनमध्ये राहिलेला हा सलग सहावा महिना …

Read More »

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली

सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …

Read More »

घाऊक महागाई सलग पाचव्या महिन्यात नकारात्मक ऑगस्टमध्ये दर ०.५२ टक्के

ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई वाढून -०.५२ टक्के झाली आहे. जुलै महिन्यात हा दर -१.३६ टक्के होता. सलग पाचव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर नकारात्मक राहिला आहे. म्हणजेच हा दर शून्याच्या खाली गेला आहे. त्याचवेळी ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त झाले आहेत. अन्नधान्य महागाई ७.७५ टक्क्यावरून ५.६२ टक्क्यांवर आली आहे. अन्नधान्य महागाईचा दर कमी …

Read More »

ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर भाज्यांच्या कमी किमतीमुळे घसरण

ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर आली. यापूर्वी जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. भाज्यांच्या कमी दरामुळे महागाईत ही घसरण झाली आहे. मात्र, चलनवाढीचा दर अजूनही आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी चलनवाढीचा दर ६.५९ टक्क्यांवर आला …

Read More »