Breaking News

एचसीएल टेककडून भागधारकांना लाभांश जाहीर १० रूपयांचा प्रति लाभांश

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. गुरूवारी एचसीएल टेकने आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ९.९ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३,८३३ कोटी रुपये झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ३,४८७ कोटी रुपये होता.

सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीतील २४,६८६ कोटी रुपयांच्या तुलनेत समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल ८ टक्क्यांनी वाढून २६,६७२ कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २६८२१ कोटी रुपये असू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता.

दुसऱ्या तिमाहीत एचसीएल टेकचे EBIT तिमाही आधारावर ४४३८ कोटींवरून ४९१९ कोटी रुपये झाले आहे. मात्र, त्यासाठी ४७०७ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले. तिमाही आधारावर दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे EBIT मार्जिन १६.९ टक्क्यांवरून १८.४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मात्र, तो १७.५ टक्के राहण्याचा अंदाज होता.

एचसीएल टेक शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ९३६.०० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ३३२०८४ कोटी रुपये आहे. गेल्या १ आठवड्यात शेअर्सने ०.९५ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका महिन्यात एचसीएल टेकने ४.५७ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर गेल्या ३ महिन्यांत शेअर्स १० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत या शेअर्सने १७.७५ टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या १ वर्षात शेअर्स २८.५५ टक्के वाढला आहे. त्याच वेळी, शेअर्सने गेल्या ३ वर्षांत ४१.३४ टक्के परतावा दिला आहे.

Check Also

आधार हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात ८ मे रोजी येणार बाजारात

आधार हाऊसिंग फायनान्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) बुधवार, ८ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *