Breaking News

अर्थविषयक

राज्य सरकार देणार उद्योगांना व्याजमाफी पण या गोष्टीसाठी उद्योग विभागाची 'विशेष अभय योजना'; बंद उद्योगांनी शासकीय देणी भरल्यास व्याजमाफी

मुंबई : प्रतिनिधी पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद उद्योग घटकांकडील शासकीय देणी थकीत असल्यास, त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम घटकाने एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम माफ करून, त्या उद्योग घटकाची स्थिर मालमत्ता अन्य उद्योग घटकाकडे हस्तांतरीत करण्यास विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. लाभासाठी निकष एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद …

Read More »

आणि लसीच्या सुरक्षित पुरवठ्यासाठी सीरमने ही कंपनीच खरेदी केली सीरमचे मुख्याधिकारी अदार पुनावाला यांची ट्विटरद्वारे माहिती

पुणे-जर्मनी : प्रतिनिधी ऑक्सफर्डच्या फॉर्म्युल्यावर तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड या कोरोनारोधक लसीचा पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित करता यावा यासाठी जर्मनस्थित SCHOTT AG Kaisha या कंपनीचे ५० टक्के समभाग सीरम इन्स्टीट्युटने खरेदी केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिली. त्यामुळे यापुढे सीरम या SCHOTT AG कंपनीची भागीदार म्हणून …

Read More »

ठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक, लक्ष्मी विलास आणि येस बँक आर्थिक घोटाळ्यामुळे गाळात आल्याने अनेक ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणावर पैसे बुडाले. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या डिआयसीजीसी कायद्याखाली आता ठेवीदारांना त्यांच्या पैशाचे विमा संरक्षण मिळणार असून बँक बुडाली तर ९० दिवसात ५ लाख रूपये ठेवीदारास मिळणार असल्याची माहिती केंद्रीय …

Read More »

Corona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा उद्योगांचा कोव्हिडविषयक टास्क फोर्स उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योगक्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. कोव्हिड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोव्हिड काळात उत्पादन न थांबविता …

Read More »

२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले? देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दिड वर्षानंतर दुसरे पॅकेज

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी दुसऱ्या कोरोना लाटेतून देशाला सावरण्यासाठी आणि देशातील अर्थकारणाला गती देण्यासाठी १५ हजारापर्यत पगार असलेल्या कामगारांच्या पीएफसह लघुउद्योग, मोठे उद्योग, आरोग्य विभाग आणि पर्यटन उद्योगावर भर देत कोरोनाने प्रभावित झालेल्या क्षेत्रासाठी १ लाख १० हजार कोटी तर इतर विभागासाठी १.५ लाख कोटी रूपयांची आत्मनिर्भर योजनेंतर्गत आपतकालीन क्रेडिट लाईन …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सहार आणि छ.शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीने अदानी एअरपोर्टला हस्तांतरीत केल्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ५० टक्के मालकीही आता अदानी समुहाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून मालकी हक्क बदलास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सदरच्या मालकी बदलास केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीच मंजूरी दिल्याने …

Read More »

करदाते आणि जीएसटी भरणाऱ्यांचे वाद आता होणार कमी महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी करदाते व वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ …

Read More »

राज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’ पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना- सुभाष देसाई

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज देसाई यांच्या …

Read More »

रेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट रिझर्व्ह बँकेकडून द्विमासिक धोरण जाहिर

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून देशातील सर्वच राज्यांमध्ये झालेली कोरोना रूग्णसंख्येतील वाढ झाल्याने लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे यंदाच्या द्विमासिक धोरणात रिझर्व्ह रेपो दर आणि कर्ज दरात रिझर्व्ह बँकेने कोणतीही वाढ न करता ती स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देत अंदाजित विकास दरात एक टक्क्याने घट होणार असल्याचा …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित …

Read More »