Breaking News

अर्थविषयक

वेदांता-फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातलाः वेदांता ग्रुपने मोदींचे आभार मानत दिली माहिती केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यस्थी आली कामाला

मागील वर्ष, दिड वर्षापासून महाराष्ट्रात वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प सुरु होण्याबाबत महाराष्ट्रात सातत्याने चर्चा होत होत्या. मात्र आज अखेर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने आपला नियोजित प्रकल्प गुजरातला स्थापन करणार असल्याची माहिती वेदांता कंपनीचे मालक तथा प्रमुख अनिल अग्रवाल यांनी ट्विट करत दिली. गुजरात सरकारने दिलेल्या सवलती आणि प्राथमिकतेमुळे हा प्रकल्प …

Read More »

सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात दिले मृत्यूचे ‘हे’ कारण पाठीमागच्या सीट बेल्टचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. मिस्त्री यांच्या निधनानंतर उद्योग क्षेत्राबरोबरच राजकिय क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालातील काही माहिती उघडकीस येत असून या …

Read More »

शरद पवार म्हणाले, मिस्त्री यांचे निधन धक्कादायक, त्यांचे विकासात योगदान मिस्त्री यांच्या कुटुंबियावर संकटाचे सत्र

पालघरच्या चारोटी येथील सुर्या नदीच्या पुलावर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी पालनजी उद्योग समुहाचे संचालक सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच दुर्देवी मृ्त्यू झाल्याची माहिती पालघरच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून …

Read More »

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच कार अपघातात निधन पालघर मध्ये त्यांच्या कारला झाला अपघात

टाटा सन्सचे माजी प्रमुख तथा सर्वात तरूण उद्योजक म्हणून प्रसिध्द असलेले सायरस मिस्त्री यांचे आज कार अपघातात निधन झालं. हा अपघात पालघर येथील चारोटी येथे झाला. रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची कार धडकून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साधारणत: दुपारी सव्वातीन वाजता त्यांच्या कारचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत …

Read More »

मुकेश अंबानी यांची घोषणा, 5G सेवा ‘या’ महिन्यापासून होणार सुरु

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 5G (फाइव्ह जी) संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. रिलायन्सची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता सुरू झाली. मुकेश अंबानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित …

Read More »

महाराष्ट्र-अमेरिका दरम्यान व्यापाराच्या व गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे अमेरिकेत व्यापार परिषद संपन्न

भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश असुन भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरिकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे ते पाहता महाराष्ट्र व अमेरिके दरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील असा विश्‍वास भारताचे न्युयॉर्क मधील कॉन्सुलेट …

Read More »

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी: पोलिसांकडून एकास अटक पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

साधारणत: वर्षभरापूर्वी प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली जीप ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी मुंबई पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेवरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता थेट उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. …

Read More »

शेअर बाजाराचे बिग बुल झुनझुनवाला यांनी अखेरचा घेतला निरोप; काय आहे पार्श्वभूमी? वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय शेअर बाजार आणि गुतंवणूक क्षेत्रातील बडे प्रस्थ तसेच शेअर मार्केटमध्ये बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी रूग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले होते. तेथेच सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन; जीएसटी, प्लास्टिक बंदी, एपीएमसी कायद्याचे प्रश्न सोडविणार राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न

राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासात व्यापार क्षेत्राचा …

Read More »

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र ७ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल …

Read More »