Breaking News

अर्थविषयक

अन्नधान्यावरील जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार महाराष्ट्र चेंबरच्या बंदच्या आवाहनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र सरकारने जीवनावश्यक असलेल्या खुल्या (अनपॅक्ड) अन्नधान्य, खाद्यान्नावर अतिरिक्त ५ टक्के जीएसटी कर लावण्याची घोषणा केली. या निर्णयाच्या विरोधात आज देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार उपसत बाजार बंद ठेवला. तसेच केंद्र सरकारने या निर्णय रद्द नाही केला तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. देशात आज …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर दास म्हणाले, दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज कौटील्य इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केले स्पष्ट

देशातील जीवनाश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टीत मोठ्या प्रमाणावर किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यातच अनेक नागरीकांकडून महागाईचा सामना करण्यासाठी स्वत:च्याच खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची बाब पुढे येत आहेत. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या सहामाहीत महागाईं हळूहळू कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आज व्यक्त …

Read More »

२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …

Read More »

घाऊक महागाईच्या दराने गाठला विक्रमी टप्पा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक

कोरोना कालावधीनंतर सातत्याने देशात महागाई सातत्याने वाढत आहे. बाजारात पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाच आता जीवनाश्वक वस्तुंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे काही वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. तर काही वस्तुंच्या किंमती आहे तितक्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या आकारमानात वजनात कंपन्यांनी घट केली आहे. …

Read More »

देशातील पहिले ”मधाचे गाव” प्रकल्पाचा ”मांघर” गावी शुभारंभ राज्यातील इतर जिल्ह्यात मधाचे गाव प्रकल्प राबविण्यात येईल-मंत्री सुभाष देसाई

मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व …

Read More »

आरबीआयने निश्चित केलेला दराचा टप्पा महागाईने ओलांडला खाद्य तेल, खाद्य महागाई आणि किरकोळ महागाई दर आतापर्यंतचा सर्वाधिक

कोरोनानंतर पेट्रोल-डिजेल आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, साबण, खाद्य पदार्थ, खाद्य तेल आदींच्या किंमतीतही वाढ होत असल्याने संपूर्ण देशभरातील जनता महागाईने चांगलीच होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्धारीत केलेल्या महागाईच्या दराचा टप्पाही ओलांडला गेला आहे. …

Read More »

रिझर्व्ह बँकेच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांवर कर्जाचा बोजा वाढणार रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातच पेट्रोल-डिझेल आणि गॅससह जीवनाश्वय वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आज अचानक रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे ईएमआयधारक असलेल्या कर्जदारांवरील कर्जाच्या आर्थिक बोजामध्ये वाढ होणार आहे. गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी, रेपो दरात …

Read More »

गॅसच्या किंमतीत पुन्हा १०० रूपयाहून अधिक वाढ, बाहेरचे खाणं महागणार हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाण्याचे पदार्थ महागण्याची शक्यता

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पहिल्यांदाच राज्यां विरूध्द थेट विरोधाची भूमिका घेतली. मात्र त्याचाच विसर कदाचित केंद्र सरकारला पडला असण्याची शक्यता असून व्यासायिक गॅसच्या किंमतीत तब्बल १०२.५० पैशाची वाढ करण्याचा निर्णय गॅस …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर ऊर्जेबाबत घेतला “हा” निर्णय पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे …

Read More »

ज्वेलरी मशिनच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर ‘ज्वेलरी मशिनरी ॲण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित …

Read More »