Breaking News

२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या.

नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत केले. मात्र रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या २००० रूपयांच्या नोटेपैकी १२.६० टक्के नोटा बाजारातून गायब झाल्याची बाब रिझर्व्ह बँकने आपल्या वार्षिक अहवालात नोंदविली आहे.

मागील काही दिवसांत अर्थव्यवस्थेतून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं निरीक्षण नुकतंच आरबीआयने नोंदविले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ च्या संपलेल्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटात १२.६० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या बाजारात २ हजार रुपयांच्या २१ हजार ४२० लाख नोटा आहेत.

गेल्या वर्षी हा आकडा २४ हजार ५१० लाख इतका होता. तर २०२० मध्ये अर्थव्यवस्थेत २७ हजार ३९८ लाख २ हजार रुपयांच्या नोटा होत्या. गेल्या दोन वर्षांत चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत २१.८१ टक्क्यांनी घट झाली आहे.

आरबीआयने गेल्या चार वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा केलेला नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत २,००० रुपयांची नोट बाजारात आणली. तसेच २०१६ मध्ये नव्याने डिझाईन केलेली ५०० रुपयांची नोटही आरबीआयने बाजारात आणली होती.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे मूल्य मार्च २०२२ मध्ये १२.६० टक्क्यांनी घसरून ४२८,३९४ कोटी रुपयांवर आले. जे गेल्या वर्षी ४९०,१९५ कोटी रुपये इतके होते.

दुसरीकडे, मार्च २०२२ मध्ये चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या वाढली असून सध्या बाजारात ४५५,४६८ लाख ५०० रुपयांच्या नोटा आहेत. मागील वर्षी बाजारात ३८६,७९० लाख नोटा होत्या अशी माहितीही रिझर्व्ह बँकेनं आपल्या दिली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने ५०० रुपयांच्या १२८,००३ नोटांचा पुरवठा केल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नोंदविली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या अहवालामुळे भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी २००० रूपयाची नोंट चलनात आणण्यात आली. आता तीच नोट पुन्हा भ्रष्टाचाराची पुरावा तर बनलेली नाही ना? अशी शक्यताही काही अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या २००० हजार रूपयांच्या १२.६० टक्के नोटा कुठे गायब झाल्या अशी विचारणाही करण्यात येत आहे.

Check Also

नाबार्ड देणार चालू वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रासाठी नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published.