Breaking News

अर्थविषयक

राज्याची अर्थव्यवस्था जैसे थे कृषी आणि उद्योग वाढीत घट झाल्याचे आर्थिक अहवालात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी गतीमान सरकार पारदर्शी कारभाराचा नारा देत साडे चार वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असून आर्थिक विकासाचा दर ७ टक्के इतकाच राखण्यात सरकारला यश आले आहे. तर राज्याच्या कृषी आणि उद्योगवाढीच्या टक्केवारीत घट झाली. तरीही यंदा मान्सून चांगला झाल्यानंतर या दोन्ही गोष्टीत वाढीची अपेक्षा …

Read More »

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये जर्मनीने गुंतवणूक वाढवावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिल इंटलिजन्स) यासह सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीने गुंतवणूक वाढवावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …

Read More »

गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट .२५ टक्के कपात

मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढती अन्नधान्याची महागाई आणि मंदावलेला विकास दरामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेत आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसरे द्विमासिक पतधोरण गुरुवारी जाहीर करण्यात आले. बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच व्याज दरात बदल करण्यात …

Read More »

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत …

Read More »

विदर्भ-मराठवाडयातील उद्योगांना २०२४ पर्यंत विद्युत शुल्क माफ उद्योग विकास-रोजगाराला मिळणार चालना

मुंबई: प्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत २०१३ ते २०१९ पर्यंत देण्यात आली होती. ही सवलत पुढील पाच वर्ष म्हणजे २०२४ पर्यंत लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्यात …

Read More »

वस्त्रोद्योजकांनी कापूस-कापड आणि फॅशन उद्योग व्यवसाय विकसित करावा 'वस्त्राय-२०१९’ कार्यशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई : प्रतिनिधी वस्त्रोद्योग हा व्यवसाय कृषी क्षेत्रानंतर मोठा रोजगार निर्मिती करणारा असून जागतिक पातळीवर हातमाग व्यवसायाला मोठी मागणी आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) मध्ये वत्रोद्योगाचा मोठा हिस्सा आहे. राज्यातील वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायात गुंतून न राहता जागतिक पातळीवरील बाजारपेठेचा आणि मागणीचा अभ्यास करुन कापड-कापूस-फॅशन असा व्यवसाय विकसित करावा, असे …

Read More »

राज्याच्या डोक्यावरील कर्ज ४ लाख १४ हजार कोटींचे होणार १९ हजार ७८४ कोटीं रूपयांची महसूली तूट येणार

मुंबई : प्रतिनिधी मागील चार वर्षापासून राज्याच्या डोक्यावरील कर्ज कमी ठेवत विकास कामांवर जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तरीही यंदाच्यावर्षी राज्याच्या डोक्यावरील कर्ज ४ लाख १४ हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे. तर महसूली तूट १९ हजार ७८४ कोटी रूपयांची येणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

८ महिन्याचा काळ, पण ४ महिन्याच्या खर्चाला मंजूरी

मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्तीची शक्यता मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीला आणखी ८ महिन्याचा कालावधी आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडत फक्त चार महिन्याच्या खर्चाला मंजूरी देण्यात येणार असल्याने मुदतीपूर्व विधानसभा बरखास्तीचा विचार राज्य सरकारकडून …

Read More »

निवडणूक दिलासा : शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय आणि कामगारांना प्राधान्य

केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक सवलती नवी दिल्ली : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० हजार रूपये पेन्शन, असंघटीत कामगारांना पेन्शन, गरोदर महिलांना पगारी सुट्टी, आणि मध्यमवर्गीयांसाठी कर उत्पन्न मर्यादेत ५ लाख रूपयांपर्यत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वांसाठी दिलासादायक ठरविण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

मुंबईत जागतिक भागिदारी परिषद १२-१३ जानेवारीला

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी येत्या १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील जे डब्ल्यू मेरियेट हॉटेलमध्ये जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र येणार आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजित …

Read More »