Breaking News

८ महिन्याचा काळ, पण ४ महिन्याच्या खर्चाला मंजूरी

मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्तीची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणूकीला आणखी ८ महिन्याचा कालावधी आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडत फक्त चार महिन्याच्या खर्चाला मंजूरी देण्यात येणार असल्याने मुदतीपूर्व विधानसभा बरखास्तीचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती विधीमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधानसभा कार्यकाळ संप्टेंबर २०१९ ला पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून पूर्ण वर्षभराचा अर्थसंकल्प मांडणे अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकारकडून पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करत संपूर्ण खर्चाला मान्यता घेण्याऐवजी फक्त चारच महिन्याच्या खर्चाला मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच जून महिन्यात पुन्हा एकदा अर्थसंकल्प मांडून उर्वरीत खर्चाला विधिमंडळाची मान्यता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणूकीत केंद्रातील भाजप सरकारला पुन्हा एकदा जनादेश मिळेल की नाही याबाबत राज्य सरकारच्या मनात साशंकता आहे. तसेच युतीतील महत्वाचा घटक असलेल्या शिवसेनेच्याबाबत अद्याप भरोसा देत येत नसल्याने राज्य सरकारकडून त्यादृष्टीने विचार सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही दिवसानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात वित्त विभागाकडून पूर्ण वर्षाचाच अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तसेच या अर्थसंकल्पात सध्या तरी कोणतीही नवी घोषणा असणार नाही. मात्र या अधिवेशनात फक्त चार महिन्याच्या खर्चाला मान्यता देणार आहे.

Check Also

आरबीआयच्या पतधोरणात वातावरणीय घटनांचा उल्लेख

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) च्या ताज्या चलनविषयक धोरण अहवालाचे (त्याच्या एप्रिल बुलेटिनमध्ये समावेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *