Breaking News

गॅसच्या किंमतीत पुन्हा १०० रूपयाहून अधिक वाढ, बाहेरचे खाणं महागणार हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाण्याचे पदार्थ महागण्याची शक्यता

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पहिल्यांदाच राज्यां विरूध्द थेट विरोधाची भूमिका घेतली. मात्र त्याचाच विसर कदाचित केंद्र सरकारला पडला असण्याची शक्यता असून व्यासायिक गॅसच्या किंमतीत तब्बल १०२.५० पैशाची वाढ करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे बाहेरील खाणे महागणार असल्याची शक्यता बळावली आहे.

पाच राज्यातील निवडणूकांच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवत जनतेच्या मनातील राग शांत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. परंतु निवडणूकीचे निकाल जाहीर होताच पुन्हा पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली. महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच झळ बसत असताना या दरवाढीने आणखी खिसा रिकामा होणार असल्याचे दिसून येत आहे.

तेल कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत १०२.५० रुपयांनी वाढ केली आहे. या किमती १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर (कमर्शियल एलपीजी सिलिंडर) वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यामुळे या निळ्या रंगाच्या सिलिंडरची दिल्लीतील नवीन किंमत आता २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे.

१९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आता २ हजार ३५५. ५० रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत २ हजार २५३ रुपये होती. त्याच वेळी, ५ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या ६५५ रुपये आहे. महिनाभरापूर्वी १ एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०५ रुपयांनी, तर २२ मार्चला ९ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

मिठाईवाले आणि रेस्टॉरंट इत्यादींद्वारे व्यावसायिक सिलिंडरचा अधिक वापर केला जातो. अशा परिस्थितीत १०२.५० रुपयांच्या या वाढीमुळे त्यांचे मासिक बजेट बिघडणार आहे. दुसरीकडे, येत्या काही महिन्यांत लग्न समारंभात त्यांचा भरपूर वापर केला जातो, त्यामुळे केटरिंग सर्व्हिसचे लोकही त्यांच्या किमती वाढवू शकतात. त्यामुळे हॉटेल, मिठाईवाल्यांसह केटरींगमधील जेवणाचे दरही महागण्याची शक्यता आहे.

Check Also

व्होडाफोन आयडियाचा एफपीओ १८ एप्रिलला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेला पाठिंबा देण्यासाठी, सरकार फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) द्वारे व्होडाफोन आयडियाच्या निधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *