Breaking News

दिवाळीनिमित्त सूट, १.३२ लाखाची स्कूटर ८६ हजारांना ५००० रूपयांची अतिरिक्त सवलत

इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सवलतीची योजना आणली आहे. कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450s स्वस्तात उपलब्ध आहे. कंपनी Ather 450s वर ५००० रुपयांची अतिरिक्त सणाची सवलत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ८६०५० रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची मूळ किंमत १.३२ लाख रुपये असली तरी सणासुदीच्या ऑफर आणि कॉर्पोरेट डिस्काउंटनंतर कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ८६०५० रुपये आहे.

कंपनी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींसाठी ४० हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू ऑफर करीत आहे. ग्राहकाच्या दुचाकीचे वय, स्थिती आणि मूळ खरेदी किंमत यावर एक्सचेंज वॅल्यू अवलंबून असेल. ही एक्सचेंज वॅल्यू नवीन एथर स्कूटरसाठी डाउन पेमेंट म्हणून वापरले जाऊ शकते.

कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर ११ ऑगस्ट रोजी लॉन्च केली होती. या स्कूटरमध्ये ग्राहकांना १८ पेक्षा जास्त नेव्हिगेशन पॉइंट मिळतात. स्कूटरची सुरुवातीची किंमत १.३२ लाख रुपये आहे. ही कंपनीची एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर आहे असून टॉप स्पीड ताशी ९० किलोमीटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज ११५ किलोमीटर आहे. Ather 450S मधील बॅटरीची क्षमता 2.9 kWh आहे.

Ather 450s ची नवीन किंमत
बॅटरी पॅक – 2.9 kwh
वास्तविक किंमत – १,३२,५५० रुपये
सणाची ऑफर – ५००० रुपये
कॉर्पोरेट लाभ – १५०० रुपये
2w चे एक्सचेंज वॅल्यू – ४०००० रुपये
नवीन किंमत – ८६०५० रुपये

Check Also

या दोन बँकांनी जारी केले भागधारकांसाठी डिव्हिडंड आरबीएल आणि आयसीआयसीआय बँकेने दिले मोठे गिफ्ट

आर्थिक वर्ष संपत आल्याने प्रत्येक संस्थांकडून त्यांच्या वित्तीय वर्षाचा जमा-खर्च सादर करण्यात येत आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *