Breaking News

बँकिंग, रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला

आठवड्यातील पहिला दिवस देशातील शेअर बाजारासाठी चांगला राहिला आहे. बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३० अंकांच्या उसळीसह ६४,११२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९४ अंकांच्या उसळीसह १९.१४० अंकांवर बंद झाला.

सोमवारी बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅसच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. तर ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह आणि ११ तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २७ वाढीसह आणि २३ शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यापारात, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ३११.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील ट्रेडिंग सत्रात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ३१०.५४ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच सोमवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.०२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

उत्कृष्ट निकालामुळे रिलायन्सचा शेअर्स २.३० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. अल्ट्राटेक सिमेंट २.०६ टक्के, भारती एअरटेल १.३६ टक्के, इंडसइंड बँक १.१३ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.७९ टक्के, लार्सन ०.७९ टक्के, एचडीएफसी बँक ०.७१ टक्के, नेस्ले ०.५६ टक्के वाढीसह बंद झाले. टाटा मोटर्स १.७० टक्के, मारुती सुझुकी १.४५ टक्के, अॅक्सिस बँक १.१८ टक्के, एनटीपीसी १.०८ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Check Also

MDH मसाले आता भारताच्या एफडीएच्या रडारवर यापूर्वी हाँगकाँगने या भारतीय उत्पादनावर आणली होती रोक

हाँगकाँगने त्यांच्या काही उत्पादनांची विक्री थांबवल्यानंतर MDH आणि एव्हरेस्ट आता यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *