Breaking News

राशिद खानला रतन टाटांकडून १० कोटी रुपये? जाणून घ्या रतन टाटा काय म्हणाले… १० कोटी रुपयांचे बक्षिस कशासाठी

अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशिद खान आणि रतन टाटा यांच्याबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की दिग्गज उद्योगपती रतन टाटा राशिद खानला १० कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहेत. कारण अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर भारताचा तिरंगा फडकावला होता. यासाठी आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला होता. या पराभवानंतर काबूलच्या रस्त्यावर लोकांनी जल्लोष केला. तर पाकिस्तानातील सन्नाटा होता. आता रतन टाटा यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या संदेशाचे खंडन करताना रतन टाटा यांनी लिहिले की, मी आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट संघाच्या कोणत्याही खेळाडूला बक्षीस जाहीर केलेले नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही.
रतन टाटा म्हणाले की, जोपर्यंत अधिकृत चॅनेलद्वारे शेअर केले जात नाहीत तोपर्यंत लोकांनी अशा व्हॉट्सअॅप फॉरवर्ड आणि व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये . यापूर्वी रतन टाटा यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

रतन टाटा यांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्याची बातमी आली होती. रतन टाटा यांनी हे फेटाळून लावले आणि हे पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले. या अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण अफवा लोकांना फसवण्यासाठी आहेत. क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत त्याचा सहभाग असल्याचा खोटा दावा करणाऱ्या एका बातमीचाही त्याने उल्लेख केला. रतन टाटा यांनी अशा लोकांना सावध राहण्याची आणि अशा फसव्या योजनांपासून दूर राहण्याची विनंती केली आणि त्यांचा कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीशी संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला.

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *