Breaking News

Tag Archives: शेअर मार्केट

हर्ष गोयंका यांचा इशारा, हर्षद मेहता, केतन पारेख यांच्या काळातील गैरव्यवहाराचे युग पुन्हा…. शेअरबाजारातील तेजीच्या निमित्ताने दिला इशारा

आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांना भीती वाटते की, हर्षद मेहता/केतन पारेख घटनांची आठवण करून देणारे गैरव्यवहारांचे युग शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान पुन्हा उदयास येत आहे. कोलकात्यात ही समस्या अधिक दिसून येत असल्याचे आरपीजी ग्रुपच्या अध्यक्षांना वाटते. गोयंका यांनी सेबी आणि अर्थ मंत्रालयाने पाऊल उचलून चौकशी करण्याचे आवाहन केले. “वाढत्या …

Read More »

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५ लाख कोटींची वाढ

भारतीय शेअर बाजार सोमवारी ६ नोव्हेंबरला सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सने ५९५ अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी १९,४०० च्या जवळ पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ३.६९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मजबूत जागतिक संकेतांनीही आज बाजाराच्या वाढीला पाठिंबा दिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून …

Read More »

बँकिंग, रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला

आठवड्यातील पहिला दिवस देशातील शेअर बाजारासाठी चांगला राहिला आहे. बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३० अंकांच्या उसळीसह ६४,११२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९४ अंकांच्या उसळीसह १९.१४० अंकांवर बंद झाला. सोमवारी बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, …

Read More »

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात या ६ शेअर्सने केले मालामाल १० वर्षांचा विक्रम

भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्‍टोबर महिना चांगला मानला जातो. मागील दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीचा सरासरी परतावा २.९ टक्के आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या १० वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यात चांगली कमाई करत …

Read More »

या आठवड्यात २६० शेअर्स देणार लाभांश, पहा यादी आठवड्यातील तीन दिवस लाभांश देणार या कंपन्या

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा कमाईची संधी देणारा ठरणार आहे. सोमवार १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात तब्बल २६० शेअर्सकडून लाभांश मिळणार आहे. हे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करणार आहेत. त्यामुळे लाभांश शेअर्समधून गुंतवणूकदारांना मोठी कमाई होईल. या शेअर्सकडून लाभांश १८ सप्टेंबर एबीसी इंडिया, ऐम्को पेस्टिसाइड्स लिमिटेड, एमी ऑर्गेनिक्स लिमिटेड, एपीएम …

Read More »

शेअर बाजारातील तेजीचा परिणाम ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

शेअर बाजारात सुरू असलेल्या जबरदस्त वाढीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने ऑगस्ट २०२३ मध्ये २०,२४५ कोटी रुपयांचा पाच महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसपीआयद्वारे केलेली गुंतवणूक ऑगस्टमध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. एसपीआयद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण १५,८१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने डेटा …

Read More »

ऑगस्टमध्ये डिमॅट खाती उघडण्याचा १९ महिन्यातील उच्चांक एकूण खात्यांची संख्या १२.६६ कोटींच्या वर

ऑगस्टमध्ये निर्देशांकात घसरण होऊनही डिमॅट खाती उघडणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. डिमॅट खाती उघडण्याचा १९ महिन्यातील हा उच्चांक आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये ३१ लाख डिमॅट खाती उघडण्यात आली. जानेवारी २०२२ पासून खाते उघडण्याची ही सर्वाधिक …

Read More »

शेअर बाजारात गुंचवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी खिशात पैसे ठेवा, या आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सहा आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होणार आहेत. अलीकडे अनेक कंपन्यांचे आयपीओही आले आहेत. यापैकी अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आताच पैशांची व्यवस्था करा. चावडा इन्फ्रा आयपीओ गुजरातस्थित चावडा इन्फ्राचा आयपीओ १२ सप्टेंबर …

Read More »

शेअर बाजार तेजीत सेन्सेक्स : २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद

जागतिक बाजारपेठेत तेजीमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजारातही तेजी दिसून आली. आयटी आणि कमोडिटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअर बाजार वधारून बंद झाले. सेन्सेक्स २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांनी वाढून १९,५२८ वर स्थिरावला. सेन्सेक्सध्ये कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६४ टक्के वाढ झाली …

Read More »